लोकशाही समृद्ध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला साथ द्या. – आयु. सुजात आंबेडकर यांचे धाराशिव येथील मतदारांना आवाहन.
तुळजापूर : काल लोकसभा 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळी वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारा साठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आयु. सुजात दादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा घेण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ मिलिंद दादा रोकडे, जीवन कदम शहर अध्यक्ष धम्मजीत कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.
तुळजापूर तालुकयातील समता सैनिक दलाने संरक्षणाची जबाबदारी पार पाडली.
यावेळी बोलताना आयु. सुजात आंबेडकर यांनी मतदारांना लोकशाही वाचवण्यासाठी व संविधानाचा भक्कम पाठिंबा दर्शविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. विरोधकांतील कोणीही निवडून आला तरी सत्ता एका घरातच राहणार आहे त्यामुळे घराणेशाही बळकट होईल पण जनतेच्या हाती कांहीं लागणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
सभेला तालुक्यातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत