देशमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षेचा निकाल आज..

महाराष्ट्र आणि गोवा राज्य अव्वल.

नवी दिल्ली : देशभरात सर्वात प्रतिष्ठित उच्च नामांकित समजल्या जाणाऱ्या CBSE पेक्षाही अवघड आणि अव्वल असणाऱ्या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE) आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर झाला आहे. 

विद्यार्थ्यांना  https://cisce.org/ किंवा results.cisce.org या वेबसाइटवर जाऊन रिझल्ट चेक करता येणार आहे. रिझल्ट चेक करण्यासाठी युआयडी आणि इंडेक्स नंबरची नोंद करावी लागणार आहे. 

ICSE आणि ISC परीक्षा वर्ष 20224च्या निकाल जाहीर झाले आहेत. 2,695 शाळांपैकी 82.48 टक्के शाळांमधील विद्यार्थी 100 टक्के उत्तीर्ण झाले आहेत. ICSE परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. 99.65 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.31 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर बारावीच्या परीक्षांमध्येही मुलींनीच बाजी मारली असून 98.92 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 97.53 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. 

CISCEच्या अधिकृत वेबसाइट cisce.org/ किंवा results.cisce.org वर जा

होमपेजवर आयसीएसई किंवा आयएससी बोर्ड परीक्षा 2024 या लिंकवर क्लिक करा

आता युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड नोंद करा

आता तुमचा रिझल्ट स्क्रीनवर समोर येईल 

तुम्ही तुमची रिझल्टची ऑनलाइन प्रिंट डाउनलोड किंवा प्रिंटआउट काढून स्वतःजवळ ठेवू शकता. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!