
या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४४ धावांनी विजय मिळवण्यात आला असून पावसाचा अंदाज लक्षात घेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने २० षटकांत ४ बाद २३५ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव २० षटकांत ९ बाद १९१ धावांवर मर्यादित राहिला. आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या अपयशानंतर मार्कस स्टोइनिस (२५ चेंडूंत ४५), कर्णधार मॅथ्यू वेड (२३ चेंडूंत नाबाद ४३) आणि टीम डेव्हिड (२२ चेंडूंत ३७) यांनी केलेले प्रयत्न अपुरे पडले. भारतासाठी रवी बिश्नोई आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
त्यापूर्वी, फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीचा भारतीय फलंदाजांनी पुरेपूर लाभ घेतला. मुंबईकर यशस्वी जैस्वाल (२५ चेंडूंत ५३) आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड (४३ चेंडूंत ५८) यांनी ५.५ षटकांतच ७७ धावांची सलामी दिली. यशस्वीने सुरुवातीपासून आक्रमक शैलीत खेळताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला. अखेर त्याला नेथन एलिसने बाद केले. यानंतर ऋतुराजने इशान किशनच्या (३२ चेंडूंत ५२) साथीने भारताचा डाव पुढे नेला. या दोघांनी ८७ धावांची भागीदारी रचल्यावर स्टोइनिसच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात किशन बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (१० चेंडूंत १९), रिंकू सिंह (९ चेंडूंत नाबाद ३१) आणि तिलक वर्मा (२ चेंडूंत नाबाद ७) यांच्या फटकेबाजीमुळे भारताला २३५ धावांचा टप्पा गाठता आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत