महाबोधी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला धम्म हाच खरा बुद्ध धम्म -ली. ची. रॅन (वाईस चान्सलर कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठ)

सम्राट अशोकाच्या कालखंडातील शिलालेख आणि त्यांनी उभारलेल्या 84 हजार बुद्ध स्तूपापैकी देवटक येथील बुद्ध स्तूपाचे अध्ययन करणे आणि त्या संदर्भात माहीती जाणून घेणे यासाठी कोरियन डेलीकेशन धम्म मास्टर ली ची रॅन व्हाईस चान्सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागभीड येथे आले. नागवंशीय भूमी नागभीड येथे धम्म मास्टर ली. ची. रॅन -वाईस चान्सलर कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठ यांचा धम्मदेशना कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून धम्म मास्टर डॉ हॉग जीन सु दक्षिण कोरिया, विशेष अतिथी म्हणून धम्म प्रचारक मंगेश दहिवले माजी सनदी अधिकारी , धम्म प्रचारक नितीन साळवे लंडन बिजनेस स्कूल तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद लांडगे हे होते.
बाबासाहेबाना अभिप्रेत असलेल्या बौद्ध धम्माचे विचार आम्ही कोरियात रुजविले आहे. बाबासाहेबांना कोरियात बुद्धानंतर महाबोधी म्हणून स्थान प्राप्त झाले आहे. नागपूर आणि नागभिड परिसर नागवंशी असून या ठिकाणी सम्राट अशोककालीन अवशेष सापडतात त्यामुळे या भूमीला जंबुद्वीप भूमी असे संबोधण्यात येते . भारतात असलेला धम्म हा विज्ञानावर आधारित असल्याने तोच खरा धम्म आहे असे ली. ची. रॅन धम्म मास्टर यांनी सांगितले .धम्म प्रचारक मंगेश दहिवले यांनी वयाच्या 23 वर्षी आयएएस होऊन सुद्धा धम्मकार्यासाठी दोन वर्षातच नोकरीचा त्याग करून धम्म प्रचाराचे कार्य अविरतपणे चालू ठेवल्याचे नितीन साळवे यांनी सांगितले. जगभरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बुद्धाने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन हाच धम्माचा खरा आधार आहे आणि याचाच आधार घेऊन मानवी कल्याण साधता येऊ शकते असे बौद्ध प्रचारक मंगेश दहिवले माजी सनदी अधिकारी यांनीआवर्जून सांगितले.
समारोपीय सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद लांडगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म या देशातील शोषित माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी बुद्धीजिवीनी कार्य कसे करायचे? याविषयीचे मार्मिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट आनंद घुटके ,डॉक्टर अनमोल शेंडे ,आर.डी. रामटेके, निकेश रामटेके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता
नीकेश रामटेके ,पुरुषोत्तम रामटेक, जय रामटेक, दिनेश खोब्रागडे, नरेश मेश्राम तसेच बौद्ध उपासक, उपाशीका नागभीड यांनी अथक परीश्रम घेतले . सूत्रसंचालन सुरेश रामटेके यांनी केलं तर आभार प्रदर्शन पुरूषोत्तम रामटेके यांनी केले.
आपला स्नेहांकित
विनोद लांडगे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत