महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

कमळ पुष्पाचे बौद्ध धम्मातील महत्त्व व त्याचे विविध प्रासंगिक उल्लेख.

कमळाचे फूल जसे गढूळ पाण्यात जन्माला येते, गढूळ पाण्यात वाढते आणि गढूळ पाण्याबाहेर उगवुन निर्मळ व स्वच्छ अवस्थेत प्राप्त होते, तसा मी जगात जन्मलेला, जगामधील व प्राकृतिक दोषांवर मात करून जगामध्ये मी निर्मल व स्वच्छ अवस्था प्राप्त करून जगू शकतो . – सुगत शुद्धोधन गौतम( गौतम बुद्ध)

1)सुगत यांची पहिली सात पावले (पहिल्या पाच शतकापर्यंत हे सुगत नाव आढळते त्यानंतर सिद्धार्थ हे नाव अस्तित्वात आले.) या प्रसंगामध्ये सुगत जन्मल्यानंतर तो सात पावले जिथे चालला त्या ठिकाणी कमळ उगवलेले दर्शवले आहे.( याचा अर्थ असा की ऐहिक जगात जन्माला येऊन देखील त्याने त्यांचे ऐहिक( Material world/ Sansari world) जगाशी त्यांचे नाते दर्शवत नाही.

2) बुद्धत्व अवस्था प्राप्त केल्यानंतर सुगत यांना कमळावर बसवलेले दाखवले जाते(Lotus posture).( इसवी सन दुसऱ्या शतकापासून ही दाखवण्याची सुरुवात झाली).

3) पहिल्या धम्मसंगती मध्ये बुद्धांनी सांगितलेले कमलसूक्त (Lotus Sutra) महास्थवीर आनंद यांनी पुनरुक्त केलेले आढळते.(Thus I heard….)

4) बुद्धांना अपचनाचा त्रास होत असल्याने महास्थविर जीवक( Vaidya Jeevak) यांनी बुद्धांना अंगठा(Thumb) व तर्जनी(Index finger) या दोन बोटांमध्ये कमळाचे बीज धरण्यास सांगितले होते त्यामुळे अपचनाचा त्रास कमी होईल असे त्यांचे म्हणणे होते.

5) अय अष्टांगिक मार्ग (आर्य हा शब्द बुद्ध धम्मा मध्ये येत नाही) याला काही वेळा कमळ मार्ग( Lotus Path) म्हणून देखील संबोधले जाते.

6) बुद्ध व महाकाश्यप यांच्यामधील नि:शब्द संवाद : एका संध्याकाळी बुद्ध प्रवचनासाठी आले होते पण त्यांनी प्रवचन न देता त्यांनी त्यांच्यासोबत आणलेले कमलपुष्प उपस्थित भिक्षूगणस दाखविले. याचा अर्थ केवळ महाकश्यप यांना कळाला. व महाकश्यप यांनी स्मितहास्य केले. आणि ते प्रवचन तिथेच संपले.( या प्रसंगातूनच असे दिसते की बुद्ध अस्तित्वात असतानाच महायान परंपरेचा प्रारंभ झाला;उदाहरणार्थ झेन परंपरा).

7) एका प्रसंगामध्ये एका सामान्य उपासकाने बुद्धास कमळाचे फुल भेट( अर्पण) म्हणून देण्यास आणले होते. त्याने त्या सर्व दिवसाची कमाई ते फुल विकत घेऊन बुद्धास अर्पण केले होते. तो गरीब असल्याने त्याला असे वाटले की त्याच्याकडून ही सर्वोच्च भेट बुद्धास द्यावी अशी त्याची निर्मळ भावना झाली.

8) बहुतेक बौद्ध देशांमध्ये कमल पुष्पाचा वापर बुद्धाला किंवा बुद्ध मूर्तीला अर्पण करण्यासाठी वापरला जातो. विशेषतः जपान, कोरिया, चीन, श्रीलंका या देशांमध्ये कमलपुष्पाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

9) बौद्ध चिकित्सा व औषध शास्त्र यामध्ये कमलपुष्पाच्या विविध अंगांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असे.(Root,Stem,Flower and Seed)

10)बुद्धत्व(Enlightenment)
अवस्था दर्शवण्यासाठी सहस्त्र कमल दल असलेले कमलपुष्प दर्शवण्याचा प्रयत्न प्राचीन बौद्ध ग्रंथांमध्ये तसेच बौद्ध चित्रशैली व शिल्पकला यामध्ये प्रामुख्याने केलेला दिसतो. यालाच महायान पंथामध्ये “Golden Lotus flower with thousand petals” या स्वरूपात बुद्धत्व अवस्था दर्शविली जाते.

त्यामुळे बौद्ध प्राचीन ग्रंथांमध्ये व बौद्ध मार्ग समजून सांगण्यासाठी काही सांकेतिक चिन्हांचा वापर करण्यात आला त्यामध्ये कमलपुष्प याला फार अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

Rajiv Shinde
(बौद्ध आर्किऑलॉजिस्ट; MBA IT and HR)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!