मुस्लिम भाइयों के सम्मान में ! वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र के मैदान में !!

७ लोकसभा मुस्लिम उम्मीदवार घोषित….
महाविकास [कांग्रेस] आघाडी अथवा महायुती यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी न देऊन वंचित ठेवण्याचे काम केलं केले.
परंतु वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सात ठिकाणी मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.
तसेच त्यांची NRC, CAA संदर्भातील भुमिका, मुख्य म्हणजे महाराष्ट्रात शांतता राखण्याचे काम केले,
यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर खुश आहे.
या सर्वाचा परिणाम सध्याच्या लोकसभा निवडणूकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला भरभरून मते देण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील इतर कुठल्याही नेत्याला अथवा पक्षाला मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याचे हिम्मत दाखवता आली नाही.
[विशेषतः काँग्रेसला मुस्लिमांची फक्त मते पाहिजे असतात परंतु प्रतिनिधित्व देण्याचे ते हिम्मत दाखवत नाहीत]
परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी ७ उमेदवार देऊन हिम्मत दाखवली.
कारण फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा कुठलाही समाजाला वंचित ठेवण्याचा विचार नाही तर प्रत्येक समाज घटकाला सन्मान देण्याचा विचार आहे आणि त्याची प्रचिती बाळासाहेबांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिली म्हणून महाराष्ट्रातील अनेकजन बाळासाहेब आंबेडकर यांना हिम्मतवाला म्हणून संबोधतात.
आता पर्यंत घोषित उमेदवार:-
२४, कल्याण लोकसभा – जमील अहमद
२८, मुंबई उत्तर पुर्व लोकसभा – दौलत कादर खान
३१, मुंबई दक्षिण लोकसभा – अफजल दाऊदानी
३०, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा – अबुल हसन खान
३६,शिरूर [पुणे]लोकसभा -डॉ.अन्वर शेख
१९,औरंगाबाद लोकसभा – अफसर खान
व धुळे लोकसभा – अब्दुल रहमान.
राहुल नागटिळक, पुणे .✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत