कर्जबाजारी भारत.. ! – संजय सोनवणी

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारचे कर्ज आता २०५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. डॉ. मनमोहन सिंग सत्तेवरून पायउतार झाले तेव्हा सरकारवरील कर्ज ५५ हजार कोटी रुपये होते. का वाढले एवढे कर्ज?
मोदी काळात हे कर्ज बेसुमार वाढण्याचे कारण म्हणजे लोककल्याण योजना नव्हेत. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक शिस्तच नसल्याने वित्तीय तूट वाढत गेली, जमा रकमेपेक्षा खर्चच अधिक राहिला आणि उत्पन्न वाढवण्यासाठीचे अन्य मार्ग शिस्तबद्ध पद्धतीने न राबवल्यामुळे कर्ज काढून तुटीचा प्रश्न सोडवण्याचा सोपा पण अर्थव्यवस्थेला घातक मार्ग वापरला गेला.
आर्थिक धोरणात फालतुगिरी करण्यात मश्गुल असलेल्या या सरकारने काही वर्गाची श्रीमंती अफाट वाढवली आणि त्याच वेळेस कोट्यावधी लोकांचे उत्पन्न घटवले. बेरोजगारीने थैमान घातले.
या काळात घोषणा केलेल्या आणि २०१७ मध्ये मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी अहमदाबाद ते मुंबई या बुलेट
ट्रेनच्या कामाचे भूमिपूजन केले. जपानने या प्रकल्पाला ०.१% दराने कर्ज देऊन भारताला जवळपास फुकटच कर्ज दिले आहे अशी हवा निर्माण केली गेली. बुलेट ट्रेन म्हणजे भारताला प्रगतिपथावर नेणारा एकमेव “विकास अग्निरथ’ असे वातावरण निर्माण केले गेले. आता या प्रकल्पाबदल मोदी सोडा, भक्तही अवाक्षर काढत नाहीत.
मोदी सरकार देशासाठी शाप ठरले आहे.
-संजय सोनवणी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत