देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

सेक्स टेप लीक करणारा प्रज्ज्वल रेवन्नाचा ड्रायव्हर बेपत्ता

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि जे.डी.(एस.)J.D.(S)चे निलंबित नेते प्रज्ज्वल रेवन्ना यांचा सहभाग असलेला अश्लील व्हि.डी.ओ. स्कँडलवरून युती सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.
जे.डी.एस.सह भा.ज.पा.वर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय गोंधळ सुरूच असल्याचं पाहायला मिळालं.

महिलांचा लैंगिक छळ आणि शोषण करणाऱ्या प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हि.डी.ओ.ने चांगलीच खळबळ उडाली आहे. कर्नाटकासह देशभरात या प्रकरणाची चर्चा होत असून एन.डी.ए. चांगलीच अडचणीत आली आहे.

दरम्यान, सूत्रांनी सांगितलं की,
हसन लोकसभा मतदारसंघातील सध्याचे खासदार आणि एन.डी.ए.चे उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना,
ज्याने विशेष तपास पथकासमोर (S.I.T.) हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता, तो १५ मे २०२४ रोजी मध्यरात्री बेंगळुरूमध्ये येण्याची शक्यता आहे.

रेवन्नाचा ड्रायव्हर चौकशीदरम्यान बेपत्ता

एस.आय.टी.ने अद्याप त्याच्या विनंतीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही आणि रेवन्ना फ्रँकफर्टहून बेंगळुरूमध्ये उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

आरोपी प्रज्ज्वल रेवन्नाचा माजी ड्रायव्हर,
ज्याने आपण
जे.डी.(एस.)
J.D.(S) नेत्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या महिलांचे व्हि.डी.ओ. असलेले पेनड्राइव्ह भा.ज.पा. नेते देवराजे गौडा यांना दिल्याची कबुली दिली होती, तो एस.आय.टी.च्या नोटीसनंतर गायब झाला आहे.

या ड्रायव्हरचं नाव कार्तिक असून प्रज्ज्वल रेवन्नासोबत १३ वर्षापासून काम केलं होतं आणि एका वर्षापूर्वी जमिनीच्या कथित व्यवहारावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर तो बाहेर पडला होता.

माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी ड्रायव्हरच्या बेपत्ता होण्यामागे काही प्रभावशाली नेते असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा उल्लेख करत कार्तिकला मलेशियाला कोणी पाठवले ? ,
असा सवाल देखील केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवकुमार यांनी विचारलं,
‘भाई असे म्हणत आहेत का?
म्हणजे त्यांना सर्व काही माहीत आहे. त्यांना केंद्र सरकारकडून माहिती घेऊ द्या.
त्याला (कार्तिक) परदेशात पाठवायला मी वेडा नाही.
मी एक स्ट्रीट फायटर आहे.
लोकांना लपवून राजकारण करण्याची मला गरज नाही. त्यांना
(देवेगौडा कुटुंबाला)
त्याची गरज आहे, असा टोलीही त्यांनी हाणला.

‘त्या मुलाने (कार्तिक) दावा केला होता की त्याने प्रज्ज्वल रेवन्नाचे अश्लील व्हि.डी.ओ. असलेला पेन ड्राइव्ह भा.ज.पा. नेत्यांना दिला होता.

पेनड्राइव्हवरून चर्चा नंतर होऊ द्या आधी खऱ्या मुद्द्यापासून दूर जाऊ नका,
असं आवाहन त्यांनी केलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!