
दहा विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. न्यूयॉर्कमधल्या बीएमसीसी, अर्थात बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज या महाविद्यालयाने महाराष्ट्रातल्या दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यायचं जाहीर केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. अशाच प्रकारची संधी जर्मनी मधील शैक्षणिक संस्थेत उपलब्ध करून देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितले. बीएमसीसीचे उपाध्यक्ष डॉ. संजय रामदथही यावेळी उपस्थित होते. ही शिष्यवृत्ती ऑगस्ट २०२४ पासून दिली जाणार आहे. विद्यार्थिनींनी मुंबईतल्या एसएनडीटी, अर्थात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात संपर्क करावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थिनींनी www.bmcc.cuny.edu/apply या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन डॉ. रामदथ यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत