अलेक्झांडर कनिंघम

पुरातत्वज्ञ
जन्मदिन – २३ जानेवारी १८१४
==================
भारतीय पुरातत्वज्ञ विभागाचे जनक अलेक्झांडर कनिंघम (Sir Alexander Cunningham) यांचा जन्म लंडन मध्ये झाला. या महान अभियंत्यानेच सर्व बुध्दलेण्यांचा शोध लावला. अजिंठा, सारनाथ, बुध्दगया, वेरुळ, कुशीनारा, नालंदा, तक्षशिला एकंदरीत भुगर्भात दडलेला सर्व बुध्द इतिहास यांनी शोधुन काढला व जगाला पटवून दिले की भारतभुमी ही खरच बुध्दभुमी आहे. भारतात बौद्ध धम्माच्या पुनर्जीवनाचा विचार करता अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर येतात परंतु सर अलेक्झांडर कनिंघम यांचे नावं मनात येत नाही. तथापि, भारत मधील महत्पूर्ण बौद्ध स्थळं शोधुन काढण्यात त्यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. लुम्बिनी, सारनाथ, साँची, कुशीनगर, तक्षशिला, नालंदा ही सर्व त्यांनी शोधून काढली. सर अलेक्झांडर कनिंघम हे ब्रिटीश सैन्यामध्ये इंजिनीयर होते. वयाच्या २१व्या वर्षी त्यांची इंजिनीयर म्हणून वाराणसीला नियुक्ती झाली. वाराणसी शहराबाहेर सारनाथ हे शांत व कल्लोळापासून दूर होते. तिथे त्यांना फेरफटका मारत असतांना एक उंच मंदिराचे घुमट आढळलं. त्यांना असे वाटलं हे कोणत्या महाराजाचे महल असावे. एक अभियंता म्हणून त्यांच्या मनात त्या वास्तू बद्दल कुतूहल वाटू लागली, मग त्यांनी शोध सुरु केला. स्वतःच्या पैशातून उत्खनन कार्य सुरु केले. उत्खननात त्यांना दगडावर कोरीव अशा प्रकारची अक्षरं मिळाली जी त्यांच्या आकलना पलीकडे होती. म्हणून त्यांनी हे शिल्प जेम्स प्रिंसेप कडे पाठवले, जे तत्कालीन रॉयल अशियाटिक सोसायटीचे सचिव होते. जेम्स प्रिंसेपने बुद्धाला आदरांजली म्हणून या लिपीचा शोध लावला. हि होती ब्राम्ही लिपी. आणि या वरून शोध लागला कि बुद्धांनी पहिले प्रवचन दिले ते हेच स्थळ, म्हणजेच सारनाथचे धम्मेक स्तूप. यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि त्यांची इतिहास व पुरातन शास्त्रात रुची अधिकच वाढू लागली. सारनाथ नंतर त्यांनी सांची इथे उत्खनन केले जिथे त्यांना सांचीच्या स्तूपा बरोबर भगवान बुद्ध, सारीपुत्त आणि महामोग्ल्लान यांच्या अस्ती मिळाल्या. सारनाथ परिसरात त्यांचे शोध कार्य सुरूच होते. त्या परिसारत त्यांना अनेक छोट्या मोठ्या वास्तू सापडल्यात. हि माहिती त्यांनी १८५४ला ‘द भिलसा टोप्स’ या नावाने पुस्तक स्वरुपात प्रकाशित केली. हि सर्व पुरातन बौद्ध स्थळे शोधून काढण्यासाठी त्यांनी फाहियान आणि ह्वेन त्सांग यांची प्रवास विवरणाची मदद घेतली. ह्वेन त्सांगची विवरणे अगदी अचूक होती. १८४६ला त्यांनी अशियाटिक सोसायटीला (कलकत्ता) पत्र पाठवलं आणि १८६०ला लॉर्ड कॅन्नींगला सुद्धा प्रस्ताव पाठवला, ज्यात त्यांनी विनंती केली की पुरातन व ऐतिहसिक स्थळे व त्यांची योग्य जोपासना आणि संशोधन करण्यासठी स्वतंत्र विभाग सुरु करण्यात यावे. याच प्रयत्नाचं यश म्हणून १८६१ रोजी ‘Archaeological Survey of India’ ची स्थापना झाली व सर अलेक्झांडर कनिंघम त्याचे मुख्य म्हणून नेमण्यात आले. १८७१ला ‘Ancient Geography of India’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक म्हणजे सम्राट अशोकच्या शिलालेखांचा संग्रह आहे, ज्यात जेम्स प्रिंसेप यांची मदद पुन्हा ह्वेन त्सांग यांच्या माहिती नुसार त्यांनी कुशिणाराचा सुद्धा शोध लावला, जिथे त्यांना भगवन बुद्धांची मूर्ति सापडली. आश्चर्य म्हणजे ह्वेन त्सांग सुद्धा त्या मूर्तीचं वर्णन केले होते. सर अलेक्झांडर कनिंघमनी महाबोधि विहाराला भेट दिली तेव्हा विहाराची जीर्ण अवस्था बघून त्यांना खुप दुःख झाले. ते लिहितात “मी फेब्रुवारी १८८१ला विहाराला दुसर्यांदा भेट दिली. जेव्हा भगवान बुद्धांच्या अस्थी भेटल्या त्या वेळी मी तिथे हजर होतो.” इतर बौद्ध स्थळाप्रमाणे नालंदा आणि तक्षशीला सुद्धा विस्मृतीत गेले होते. १८१२ मध्ये फ्रान्सीस बुकानन यांनी नालंदा विद्यापीठ शोधून काढले. पण अलेक्झांडर कनिंघम यांनीच ते नालंदा विद्यापीठ आहे म्हणून ओळखले. १८७२ साली त्यांनी तक्षशीला विद्यापिठ सुद्धा शोधून काढले. उत्खनन कार्य ASI ने पूर्ण केले. अश्या या महान व्यक्ती कार्याला एका लेखात न्याय देता येणार नाही. हे अगदी निर्विवादपणे सांगता येईल कि सर अलेक्झांडर कनिंघम जगातील सर्वोत्तम पुरातत्वशास्त्रज्ञ होते, कारण त्यांनी अगदीच विस्मृतीत गेलेला इतिहास जगासमोर आणला. त्यांच्या कार्यास त्रिवार अभिवादन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत