डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने नळदुर्ग शहर दुमदुमले
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जयंतीच्या निमित्ताने नळदुर्ग शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक करण्यात आले या मिरवणूक निघण्यापुर्वी महाराष्ट्र राज्याच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध , परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुष्प वाहून पूजा करण्यात आली पत्रकार तथा बोध्दाचार्य दादासाहेब बनसोडे त्रिशरण पंचशील दिले यावेळी
आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटीचे प्रमुख सूर्यकांत सुरवसे नालंदा बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उप प्राचार्य शिवाजी बनसोडे , डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे , आर पी आय मराठवाडा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे , देवानंद बनसोडे , बुद्ध विहार मंडळाचे सचिव बाबू बनसोडे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव कुमठेकर ॲड अभिजीत बनसोडे, सेवानिवृत्त सैनिक पद्माकर पुजारी , विद्याधर वाघमारे सामाजिक कार्यकर्ते बापू दुरुगकर शिवसेनेचे नेते कमलाकर चव्हाण माजी तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले
श्याम कनकधर , सचिन बनसोडे , किशोर बनसोडे , राजेंद्र कांबळे , महादेव कांबळे ,दात्तात्रय बनसोडे ,नळदुर्ग नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक दीपक कांबळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मूर्ती पूजन करण्यात आले .गुलाब फुलांची उधळून करून मिरवणुकीची सुरवात केली नळदुर्ग शहर अक्षरक्षा तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते
ढोल ताशा डॉल्बी सिस्टीम सह शोभेची दारू लेझीम पथका सह नळदुर्ग शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणुक कसाई गल्ली , किल्ला गेट , पोलीस ठाणे , क्रांती चौक , चावडी चौक , शास्त्री चौक , डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक , अक्कलकोट रोड , बुद्ध नगर डॉ आंबेडकर नगर , मार्गे बुद्ध विहारा समोर या मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी शहरात नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक विनायक अंगारे माजी नगरसेवक बसवराज धरणे पप्पू पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचारी मुकदम वाल्मिक खारवे खंडु शिंदे , विविध पक्षांचे पदाधिकारी संघटना व संस्थांचे पदाधिकारी गावातील माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष आदिनी खूप मोठ्या पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले .नळदुर्ग ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शना खाली ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक ईश्वर नांगरे यानी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेऊन खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केले
शेवटी पत्रकार तथा बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी सर्वाचे आभार मानत त्रिशरण पंचशिल घेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत