भाजपा चां सनातन वाद , आणि विश्वकर्मा योजना ,,,,,,!
ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न :-9960178213
भाजपा अनेकांना समजली नाही , आणि तिच्या अंतरंगात घुसून तिची उद्दिष्ट आणि अंतिम हेतू समजाऊन घेतल्या शिवाय भाजपा समजत नाही.
भारतीय राजकारणात अस्तित्वात असलेल्या बहु पक्षीय राजकारणातील भाजपा एक पक्ष आहे , आणि या पक्षाकडे पक्ष म्हणून पाहण्याची दृष्टी असणे हीच मुळात चुकीची धारणा आहे .
माझे हे विधान तुम्हाला चक्रावून टाकेलं .
पण पुढे जेंव्हा आपण अधिक खोलात जाऊ तेंव्हा आपणास कळते की , इथे सर्व पक्षाला एक विचारधारेचा पाया असतो ,
जसे की री पा ई हा पक्ष अनेक गट तट यात विभाजित असला , जात मानसिकतेने तो मर्यादित झालेला असला तरी या पक्षाचा आधार फुले शाहू आंबेडकर वाद आहे , तो संसदीय लोकशाहीवर , भारतीय राज्य घटने वर विश्वास ठेवतो , धर्म , जातीय ध्रुवीकरण याचा तो विरोध करतो आणि समग्र मानव एक आहेत व यांच्यात समान अधिकार असून श्रेष्ठ कनिष्ठ सामाजिक रचनेला तो नकार देतो ,
सामाजिक राजकीय आर्थिक बदल वैचारिक परिवर्तना द्वारे आलेले शासक बहुमताने निर्णय घेऊन कल्याणकारी कायद्याच्या निर्मिती द्वारे घडवून आणेल हा विश्वास या पक्षास वाटतो ,
या बदलासाठी फक्त काटेकोर अंमलबजावणी ची आवश्यकता तो जाणतो व सर्व प्रकारच्या हिंसाचारी मार्गाचा त्याग तो करतो .
दुसरे पक्ष हे उदारमतवादी धोरण स्वीकारणारे असून गांधीवादी समाजवादी विचारसरणी पाया असलेले काँग्रेस सारखे पक्ष आहेत ,
जे सर्व समाजाला , समाजातील सर्व जाती पंथ यांना सोबत घेऊन राजकारणातील सत्ता द्वारे सामाजिक , आर्थिक , राजकीय बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करतात.
साम्यवादी समाजरचना निर्मिती चे स्वप्न घेऊन संसदीय मार्गाने तर कांहीं गैर संसदीय सशस्त्र मार्गाने परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात
इतर पक्ष हे द्राविडीयन संस्कृती वर आधारित , तर बाकीचे प्रादेशिक वाद , भाषा वाद यावर आधारित आहेत .
भाजपा या देशात बहुसंख्याकांच्या धार्मिक मान्यते ला आपला आधार बनवते ,
आणि भारतात झालेल्या धार्मिक सांस्कृतिक क्रांती ला मूळ संस्कृती विरोधी मानते , या शिवाय मुस्लिम , ख्रीच्छन , धर्मियांच्या आक्रमणाने झालेली सांस्कृतिक सरमिसळ ही मूळ हिंदू वर्ण जाती व्यवस्था , त्याच्या रूढी परंपरा , स्त्रियांचा दर्जा यावर आघात करून समग्र व्यवस्थेला धक्का पोहचवते असे ते मानतात ,
इतिहासातील आक्रमणे , राजकीय सत्तेच्या लढाया यातून झालेला हिंसाचार , व धार्मिक स्थळावरील त्यांनी केलेली सांस्कृतिक चढाई या विरोधात जनमत तयार करून त्या अल्पसंख्यांक वर्गावर आपली राजवट स्थापित करू पाहते ,
आपल्या सामूहिक शक्ती चे आधारे त्यांना दुय्यम नागरिकत्व प्रदान केल्या नंतर त्यास विरोध न करता ते त्यांनी स्वीकारून त्यांच्या राजवटीला मान्यता देऊन स्विकारण्याची अट ठेवते.
“इस देश में रहेना होगा , तो जय श्रीराम कहना होगा”
किंवा
“जो हिंदू हित की बात करेगा, वही हिंदुस्तान मे राज करेगा “
या सारख्या घोषणा पोकळ हवेतून निर्माण झालेल्या नाहीत.
हे समजून घ्यावे लागते ,
पाकिस्तानच्या फाळणी नंतर उरलेले आहे ते हिंदू राष्ट्र आहे , धर्म निरपेक्षता एक ढोंग असून ते मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळन्याचा प्रकार आहे ,
“धर्मांतर हेच राष्ट्रांतर ” अशी मानसिकता या साठी विकसित झाली की एकदा व्यक्तीने धर्मांतर केले की त्याची सांस्कृतिक (रूढी, परंपरा , जात व्यवस्था , व त्या आधारे अस्तित्वात असलेले त्याचे सामाजिक स्टेटस )याची नाळ तुटते , व तो त्या समुहा पासून अलग होतो .
अशा स्वरूपाच्या धर्मांतरण मुळे मूळ धर्मियांची संख्या घटते व ही बाब त्या धर्मा साठी घातक ठरते .
या भावनेचा उदय अलिकडचा नाही , अगदी छत्रपती शिवराय यांनी ही नेताजी पालकर यांचे केलेले शुध्दीकरण ,,,, आणि
संत गाडगे बाबा यांनी ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय मातीशी नाळ जोडलेल्या धर्माचा स्वीकार करावा अशी केलेली विनंती वजा सूचना या बाबी तील समानता दर्शवतो .
पण आपला मुद्दा तो नाहीच , भाजप ने शिक्षण पद्धती पासून ते आर्थिक बाबीत जी निती धोरणे स्वीकारली आहेत ती त्यांच्या मान्यतेनुसार च आहेत ,
जसे की गुरुकुल आश्रम पद्धत , आणि” विश्वकर्मा स्वयंरोजगार योजना “
पारंपारिक कौशल्य आत्मसात केलेल्या ग्रामीण कारागीर , सोनार , कुंभार , मूर्ती कार , लोहार , सुतार , पादत्राण बनवणे , बुट्ट्या विणणे (बुरुड) आदी बारा बलुतेदार यांच्या साठी पी एम विश्वकर्मा योजना आणली गेली ,
प्रार्थमिक मदत म्हणून सरकारला न परतावा देणारे 15,000व त्या नंतर तीन लाख रुपये कर्ज देऊन त्याचा स्थानिक उद्योग उभा करणे , अधिकचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रति दीन 500रुपये
स्टायपेंड देणे , कौशल्य सर्टिफिकेट प्रदान करणे ,
वर वर पाहता ही योजना असणे कुणाला ही गैर वाटणार नाही , पण यातच एक जाती अंतर्गत व्यवसाय कौशल्य लपलेले आहे ,
सनातनी भाजप चे दृष्टीने गाव खेड्यातील जाती आधारित व्यवसाय व्यक्तीला ते स्किल , (कुशलता)प्रदान करते , आणि यातूनच ते काम परिपूर्ण बनू शकते
मुक्त स्पर्धा , आणि अनुपयुक्त ठरणारे शिक्षण या मुळे नाहक बेरोजगारी वाढत आहे ,
माझ्या शी एका संघ विचारका ने साधलेल्या संवादा नुसार त्यांचे हे मत त्यांनी व्यक्त केले होते , जरुरी नाही की लाखो लोकांनी प्रचलित शिक्षण घेऊन शासकीय नौकरी , वकील , डॉक्टर , इंजिनियर बनावे , किंवा तसा पर्याय निवडावा ,,,,
याच भूमिकेला अनुसरून भाजप ने शिक्षण व्यवस्थेचा फास आवळत आणला आहे , परदेशी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप ही अडवून धरण्यात आल्या , तर पी एच डी धारकांना स्कॉलरशिप नाकारण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळांचे ही खाजगीकरण होणार आहे , महाराष्ट्रातील 62हजार शाळा खाजगी व्यवस्थापनाकडे जातील तेंव्हा त्याच्या महागड्या फी मुळे बहुजन वर्ग शिक्षण क्षेत्रा बाहेर फेकला जाईल ,
ग्रामीण भागातील ई श्रम कार्ड धारकांना टूल्स किट वाटप करून समाजातील मोठ्या वर्गाला जगण्याचा मार्ग भाजप ने दर्शवून दिला आहे ,
बेरोजगार राहून जीवनाशी संघर्ष करण्या ऐवजी आत्ता कुठे आहेत नौकरी मग शिक्षण कशाला घ्या त्या पेक्षा पारंपारिक उद्योग व्यवसाय करा व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णत्वाला न्या असेच त्यांना सुचवायचे आहे ,
मोदी जी चे कार्यकाळात एस सी,
एस टी प्रवर्गा वरील 5,00,000(पाच लाख कोटी निधी ) इतरत्र वळवण्यात आला हे भीषण वास्तव आहे .
या विरोधात बोलण्याची हिंमत एक ही राखीव जागेवरील भाजपा खासदार करू शकलेला नाही त्यामुळे ही प्रतिनिधीत्व बहुजन समाजासाठी उत्थानााठी कार्य करतील अशी आशा करणे ही व्यर्थ आहे
भाजपचे अंतिम उदिष्ट हिंदू धर्म ग्रंथ , त्यातील सामाजिक कायदे या आधारे देश चालवणे हेच आहे , आणि याचा फटका आपल्या पुढच्या पिढीला काय बसेल याचे आत्मभान नसलेला , जाण नसलेला मतदार भाजपची सत्ता यावी अशी कामना करणारा आहे ,यात बारा बलुतेदार अधिक आहेत हे वास्तव सोशल मीडिया वरील मतदारांचा कौल आणि मानसिक कल कोणत्या दिशेला आहे हे दर्शवून गेला आहे , किरकोळ लाभार्थी झालेला मतदार लाभाच्या आशेने स्वतः चे भवितव्य आणि अस्तित्वावर स्वतः चे हाताने कुऱ्हाड चालवून घेत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत