उद्या 10 सप्टेंबर रोजी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक.

मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस सुट्टीचा असला तरी उद्या 10 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक असल्याने मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे (Technical works signal system) करण्यासाठी उद्याचा मेगाब्लॉक असणार आहे. रविवारचा मेगाब्लॉक तिन्हीही मार्गावर असणार आहे. त्यामुळे काही रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरील ‘ब्लॉक’मध्ये
मध्य रेल्वेच्या मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत असणार आहे. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानका दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकादरम्यान थांबून त्या विद्याविहार स्टेशनवर योग्य डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबणार आहेत.
हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक…
पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरही सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसटीएमटी येथून पनवेल व बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्य करण्यात आल्या आहेत. पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्याअप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच नेरुळहून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून नेरुळकरिता सुटणारी डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेचा ब्लॉक
पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप डाऊन आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व सेवा या जलद मार्गावर चालविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ब्लॉकच्या दरम्यान काही उपनगरीय गाड्याही रद्द केल्या जाणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत