बीड पोलिसांची मान उंचावली;
एका ए.पी.आय.सह दोन कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक
बीड : जिल्हा पोलिस दलातील एका सहायक पोलिस निरीक्षकांसह दोन कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहिर झाले आहे.
१ मे २०२४ रोजी पोलिस मुख्यालयावर त्यांना हे पदक वितरीत केले जाणार आहे.
दंगल नियंत्रण पथकाचे प्रभारी अधिकारी
महादेव ढाकणे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे
विष्णू काकडे, दत्तात्रय दुधाळ यांचा यात समावेश आहे.
महादेव ढाकणे यांनी जिल्ह्यात अगोदर बीड शहर पोलिस ठाणे आणि नंतर अंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर विष्णू काकडे यांनी देखील शहर वाहतूक नियंत्रण शाखेत उत्कृष्ट कार्य केलेले आहे.
दुधाळ यांची नेमणूक जरी शहर वाहतूक नियंत्रण शाखेत आहे.
परंतू मागील अनेक वर्षांपासून ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
या तिघांनीही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
त्यामुळेच त्यांना पदक जाहिर झाले आहे.
१ मे २०२४ रोजी पोलिस मुख्यालयावर सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन यांचा गौरव केला जाणार आहे.
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,
अप्पर अधीक्षक
सचिन पांडकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत