प्रा. धीरेंद्र पाल सिंग यांची टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कुलपतीपदी नियुक्ती.
दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
मुंबई : देशातील प्रतिष्ठित अशा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या म्हणजेच TISS च्या कुलपतीपदी प्राध्यापक धीरेंद्र पाल सिंग यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
धीरेंद्र पाल सिंग यांनी भारतातील उच्च शिक्षणासंदर्भातील शिखर संस्था असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून २०१८ ते २०२१ या कालावधीत कार्यभार सांभाळला आहे. प्राध्यापक सिंग यांनी जवळपास चार दशके भारतीय उच्च शिक्षणातील अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक पदे भूषवली आहेत.
त्यांनी वाराणसीमधील बनारस हिंदू विद्यापीठ, सागर येथील डॉ. एच. एस. गौर विद्यापीठ आणि इंदौरमधील देवी अहिल्या विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवले आहे. बंगळूरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे संचालक म्हणूनही काम केले आहे. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ (सीएबीई), भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर), युनेस्को व रुसासह भारतीय राष्ट्रीय सहकार आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी समिती इत्यादींचे पदसिद्ध सदस्य म्हणून योगदान दिले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत