नांदेड मध्ये उच्च शिक्षित तरुणाने EVM मशीन फोडले; लोकशाही वाचविण्यासाठी धाडसी कृत्य केल्याची चर्चा ?

नांदेड : जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रात एका तरुणाने कुऱ्हाडीच्या तुंब्याने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले आहे. भैय्यासाहेब येडके असे ईव्हीएम मशीन फोडलेल्या आरोपीचे नाव आहे.
मतदान केंद्रावर बराच वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. मशीन जरी फुटली असली तरी झालेल्या मतदानाचा डाटा सुरक्षित असल्याचे मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी सांगितले.
EVM फोडणारा तरुण भैयासहेब येडके हा उच्च शिक्षित असून EVM मुळे लोकशाही धोक्यात येत असल्याचे मानून EVM द्वारे निवडणुका घेण्याला विरोध दर्शविण्यासाठी त्याने हे कृत्य केले असल्याची चर्चा आहे. दरम्यान बराच वेळ ताब्यात घेतल्या नंतरही पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंद केला नव्हता व दुसरे मशीन आणून निवडणूक प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत