निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

रक्षा खडसेंची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता; अर्जात अवैध गौण खनिज उत्खलन प्रकरणातील खटल्याची माहिती लपवल्याचे उघड ?

रावेर : लोकसभा 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी अवैध गौण खनिज उत्खलन प्रकरणातील असलेल्या खटल्याची माहिती लपवल्याचे समोर आले आहे. अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

अर्ज छाननी मध्ये याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे आपण तोंडी आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कागदपत्र वेळेत न दिल्याने हा आक्षेप फेटाळला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर हे याबाबत दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात रक्षा खडसे ह्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!