धाराशिव येथे मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाची बैठक संपन्न

दिनांक दि. 22/04/2024 रोजी स्मृती बुध्दविहार येथे संपन्न झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. आनंत लांडगे, संघटनेचे उत्तम भालेराव, डी.एल. वाघमारे यांच्या पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या सदस्यांना प्रदेशाध्यक्ष प्रा. आनंत लांडगे यांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सध्याचा काळ संघर्षमय आहे, सेवानिवृत्त कर्मचाज्यांनी सामाजिक बांधिलकी स्विकारुन आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून कार्य करावे. अध्यक्ष पदावरुन पोलीस क्राईम न्युज लाईव्ह चॅनलचे डी.एल. वाघमारे म्हणाले की, मागासवर्गीय, वंचित, उपेक्षित समाजातील तरुण-तरुणींनी स्पर्धेत उतरुन आय.ए.एस., आय.पी.एस. झाले पाहिजे. त्यासाठी येणाज्या काळात यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. परीक्षेची तयार करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा माझा संकल्प आहे असे ते म्हणाले.
यावेळी शासकीय पॅनल वर प्रमाणित लेखा परीक्षक म्हणून बाळासाहेब शंकरराव माने यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या पुष्पगुच्छ, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. सुनिल बनसोडे यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. सुदेश माळाळे यांनी केले. कार्यक्रमास श्रीकांत चिलवंत, सुनिल बनसोडे, एल.एस. माने, अरुण बनसोडे, बाळासाहेब माने, प्रभाकर बनसोडे, अशोक बनसोडे, विजय गायकवाड, दिपक सरवदे, दिलीप वाघमारे, चंद्रशेखर ढाले, इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार जिल्हा संघटक विजय गायकवाड यांनी मांडले.
– रेवते सुधाकर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत