एका तेजाची दुसऱ्या तेजाला सविनय भेट.. !

४ मार्च रोजी च्या दैनिक जागृत भारत च्या आवाहनाला हजारो धम्म प्रेमीं चा प्रतिसाद.




छत्रपती संभाजी नगर: तेजःपुंज प्रभावलययुक्त सोनेरी किरणांनी उजळून निघालेली सम्यक संबुध्द यांची आभा आज याची देही याची डोळा पाहीली, मंद उजेड असलेल्या चैत्यगृहातील गाभाऱ्यात उत्तरायणातील मावळतीला जाणाऱ्या सूर्यकिरणांनी काही काळ सम्यक संबुध्द यांचा चेहेरा आणि चैत्यगृह उजळून काढाला, धम्म चक्र प्रवर्तन मुद्रेतील प्रलंबपाद अवस्थेतील सम्यक संबुध्द यांच्या शिल्पाच्या पायापासून सूर्यास्ताची किरणे सांयकाळी बरोबर चार वाजून दहा मिनिटांनी हळू हळू मुखाच्या दिशेने सरकायला सुरुवात झाली ही सोनेरी किरणे सम्यक संबुध्दांच्या मुखावर काही काळ स्थिरावण्यासाठी बरोबर तासाभर लागला म्हणजे पाच वाजून दहा मिनिटांनी अंधारलेल्या पार्श्वभूमीवर एक तेजःपुंज चेहारा सोनेरी किरणांनी उजळून निघाला होता जणू काही एका तेजाची दुसर्या तेजाची भेट.
हा संपूर्ण प्रसंग महाराष्ट्रातील एकमेव छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद इथल्या वेरूळ लेणी समूहातील दहा क्रमांकाच्या लेणीत संपन्न होतो , प्राचीन काळातील स्थापत्य विशारदांनी खगोलशास्त्र आणि स्थापत्य यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक घडवून आणलेले अफलातून सादरीकरण , शतकानू शतके सुरू असलेला हा संपूर्ण नेत्रदीपक नैसर्गिक सोहळा आपल्या चक्षू द्वारे आपल्या स्मृतीपटलावर कायमचे उमटवून घेण्यासाठी अनेक कलासक्त जिज्ञासू मने इथे हजर होती जी संपूर्ण राज्यभरातून व देशभरातून आली होती काही विदेशी पर्यटकांनी देखील हा सोहळा अनुभवला.
वर्षातून फक्त एकदाच उत्तरायणातील किरणोतस्व वेरूळ लेणीत दोन दिवस असतो दहा मार्च आणि अकरा मार्च त्यातील दहा मार्च हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस असतो.
आता हा नैसर्गिक सोहळा ज्यांना पाहायचा आहे त्यांनी पुढच्या वर्षाची वाट पाहावी, पुढच्या दहा मार्चला भेटू.
आयु. सूरज रतन जगताप
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत