अप्रतिम निवृत्त पोलिस संघटन व उत्तम समाजसेवेबद्दल आयु. अशोक दिलपाक यांचा सत्कार.
सोलापूर : २० एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता मातोश्री शारदा ताई शिंदे यांचे स्मरणार्थ आयोजित केलेल्या वधू वर मेळावा मध्ये आपले वसुंधरा फाउंडेशन पुणे चे प्रमुख मा फराज इंतफाक यांनी आयु. अशोक दिलपाक यांचा पुणेरी पगडी व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.
शाक्य संघ च्या माध्यमातून निवृत्त पोलिसांचे उत्कृष्ट संघटन, मुळगाव कुंभरी येथे समाज बांधवांना एकत्र करत विविध सामाजिक उपक्रम यशस्वी पणे पूर्ण करणे, वृक्षारोपनाच्या माध्यमातून निसर्गाची सेवा, व सामाजिक उपक्रमा मध्ये जिथे गरज असेल तिथे तन मन धनाने समाजसेवा करीत असल्या बद्दल त्यांचा सत्कार व अनुकरण करणे आवश्यक आहे या भावनेतून त्यांचा पुणेरी पगडी व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम रविवार रोजी समाज कल्याण हॉल सोलापूर येथे मा अंबादास शिंदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत