राजाभाऊ महाबोले यांच्या संकल्पनेतील अनाथ विद्यार्थांना साखरेचे हार वाटप

नळदुर्ग “आपलं घर ” येथे अनाथ विद्यार्थ्यावर मायेचा आधार
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून खूप मोठ्या प्रमाणात चांगलीच ओळख आहे
परंतु ३० सप्टेंबर १९९३ ला जेव्हा महाप्रलयकारी भूकंप झाला त्या भूकंपामध्ये अनेकांनी जीव गमविला त्या भुकंपात मयत झालेल्या कुटुंबातील विद्यार्थाना शिक्षणाचे धडे देण्यासाठी व अनाथ बालकांना मायेचा ओलावा टिकून राहण्यासाठी “निराधाराचं आधार घर ” नळदुर्ग च्या बालाघाट डोंगराच्या कुशीत निर्माण झाले त्यानंतर नळदुर्ग या ठिकाणी आपलं घर नावाचं एक रोपट उभारलं गेलं त्या रोपट्याचे रूपांतर खूप मोठ्या वृक्षात दिसु लागले आहे त्याच रोपट्यातल्या निराधार व अनाथ मुलाना साखरेच्या हाराचे वाटप करून विद्यार्थ्यां मध्ये एक गोडवा निर्माण केले आहेत माजी नगरसेवक विनायक अंहकारी यानी विद्यार्थ्या बद्दल आपली भावना व्यक्त केली
त्याचाच भाग म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ महाबोले यांच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांसोबत गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न पाडव्या दिवशी गेला परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे परत दोन दिवसांनी या अनाथांना मायेचा आधार देत विद्यार्थ्यांमध्ये गोडवा निर्माण केला शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी साखरेचे हार वाटप केले यावेळी नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक विनायक अंहकारी , ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे , माजी नगरसेवक महालिंग स्वामी , नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे सचिव तानाजी जाधव , पत्रकार दादासाहेब बनसोडे , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव यावेळी नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये
राजाभाऊ महाबोले सुभाष महाबोले भगवानराव माने मयूर महाबोले संतोष महाबोले हणमंत हिलाल शुभम महाबोले यांच्या सह नागरीक उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत