रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द

शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड बँक महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी महाराष्ट्रातील या बँकेवर मोठी कारवाई केली आणि तिचा परवाना रद्द केला. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. RBI ने बँकेला ४ डिसेंबर २०२३ पासून सर्व प्रकारचे व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात अधिकृत निवेदन जारी करून रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कोल्हापुरातील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड ४ डिसेंबरपासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकत नाही. याबरोबरच बँकेत पेमेंट किंवा ठेवी घेण्यावरही पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती देताना सेंट्रल बँकेने सांगितले की, या सहकारी बँकेकडे बँकिंग सेवा देण्यासाठी पुरेसे भांडवल नाही. याबरोबरच भविष्यात कमाईच्या साधनांबाबत कोणतीही ठोस योजना मांडण्यात बँक अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरबीआयच्या नियमांचे पालन होत नसल्याने आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत