मंत्रीपदासाठी भरत गोगावले म्हणाले “सगळे प्रयत्न करून दमलो”

दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान गोगावले यांनी माझ्या मंत्रीपदासाठी आता महादेवालाच साकडे घाला असे आवाहन गावकऱ्यांना केले होते. त्यामुळे मंत्रीपदापासून वंचित राहिल्याची सल गोगावले यांना बोचत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.
सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवाला कौल लावून विचारायचे राहिले आहे. काय अडचण आहे ते बघावे लागेल, मानपान राहिला असेल तर तोही करावा लागेल, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केले. ते महाड येथे पत्रकारांशी बोलत होते. मला अजूनही मंत्रीपदाची आशा असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत