आपले ध्येय संविधान जनजागृतीसाठी, भावी पिढीच्या उत्कर्षासाठी…

विलास पवार
अध्यक्ष – संविधान गुण गौरव समिती
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र’ आयोजित प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्नेहभेट आणि राज्यस्तरीय कविसंमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार उपक्रम रविवार दिनांक १४/०१/२४ रोजी ठिक १०.०० वाजता संपूर्ण दिवस मान्यवरांच्या उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात स्वातंत्र, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, एकात्मता टिकविण्यासाठी आणि स्वावलंबी परिवर्तन घडविण्यासाठी सामाजिक क्षेत्र, शैक्षिणक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारिता, वैद्यकीय खाते, पोलीस खाते इत्यादी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा राज्यस्तरीय सामाजिक गौरव पुरस्कार कृतज्ञापूर्वक देवुन गौरव करण्यात आला.
आद. आयु. पठाण सरांचे विविध माध्यमातून संविधान जनजागृतीचे जे कार्य सुरू आहे, त्या कार्याची दखल घेत सदर संस्थेने या उपक्रमात आद. आयु. पठाण सरांना “राज्यस्तरीय सामाजिक गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले. हा सन्मान स्विकारतांना सरांनी आपल्या मनोगतात समर्पित भावनेतून “हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या कार्यात मला सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनींचा आहे.” असे व्यक्त होत कृतीतूनही ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सन्मान स्वीकारताना त्या याप्रसंगी उपस्थित असलेले सरांचे सहकारी आयु. विलास पवार, आयु. मालाताई मेश्राम, आयु. ज्योतीताई क्षीरसागर, मित्रवर्य महेंद्र ओव्हाळ आणि मुब्बशिर वलीले यांना सदर सन्मान स्विकारण्याची विनंती केली. या सर्वांना विचारमंचावर आमंत्रित करून सामुहिक स्वरुपात पुरस्कार स्विकारत तो सर्व सहकारी बंधू आणि भगिनींना समर्पित केला. या प्रसंगाचे विचारमंचावरील काही क्षणचित्रे…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत