गडचिरोली येथे तीन जागी EVM खराब; मतदारांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ.

गडचिरोली : वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोगाने दखल न घेतल्याने काल पहिल्याच दिवशी मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. तेलंगणा सीमेवर शेवटच्या टोकावरील सिरोंचात मतदान प्रक्रिया सुरु असताना तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. मतदारांना 2 तास ताटकळत राहावे लागले. शेवटी हेलिकॉप्टर ने दुसऱ्या EVM मशीन आणून मतदान घेतले गेले.
१९ एप्रिलला सकाळी नऊ वाजता सिरोंचात तीन मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. अखेर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदित्य जीवने यांनी वरिष्ठांनी संपर्क केला. त्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अहेरी येथून राखीव म्हणून ठेवलेल्या ईव्हीएममधून तीन ईव्हीएम हेलिकॉप्टरने पाठवून दिले. त्यामुळे प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली. सुरक्षेच्या कारणास्तव संवेदनशील भागात यंत्रणेकडून यावेळी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत