परदेशी चित्रपट निर्मिती संस्थासाठी इफ्फीत मोठी घोषणा, निधीत केली भरघोस वाढ – मंत्री अनुराग ठाकूर

गोव्यात पणजी इथे होत असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी –
परदेशी चित्रपट निर्मिती संस्थासाठी इफ्फीत मोठी घोषणा, निधीत केली भरघोस वाढ – मंत्री अनुराग ठाकूर
भारतात सिनेमाचं चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत वाढ करून ती चित्रिकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या 40 टक्के इतकी केली जाईल अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली आहे.
यापूर्वी, प्रत्येक प्रकल्पासाठीच्या प्रोत्साहनाची मर्यादा केवळ 2.5 कोटी रुपये होती. आता या मर्यादेत वाढ करून ती 30 कोटी रुपये (3.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त) केली जाईल असेही त्यांनी सांगितले. यासोबतच ज्या सिनेमांमध्ये भारताशी संबंधीत महत्त्वाचा आशय असेल अशा चित्रपटांसाठी अतिरिक्त 5 टक्के निधी बोनस म्हणून दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत