नळदुर्ग येथे नगर परिषदेत राष्ट्रपिता महात्मा फुले यांची जयंती साजरी

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग नगरपालिकेत दि.११ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
दि.११ एप्रिल रोजी सर्वत्र क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. नळदुर्ग येथे ही नगरपालिका कार्यलयात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुधीर हजारे, भाजपचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, रिपाईचे शहर अध्यक्ष मारुती खारवे, विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे,शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे,न.प.चे कर्मचारी खंडू नागणे, शहाजी येडगे आदीजन उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत