लोकशाही मूल्यांचे जतन करण्या हेतूने भिवंडी तून अपक्ष लढणार – निलेश सांबरे; वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

भिवंडी : लोकसभा 2024 च्या तोंडावर संविधान बदलणे, विरोधक संपवणे, ED CBI च्या माध्यमातून विरोधकांना कोंडीत पकडने असे लोकशाही विरोधी अनैतिक प्रकार चालू आहेत. त्यामुळे या शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनीही भिवंडी मतदार संघात स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या लोकशाही मूल्यांचे जतन व्हावे तसेच त्यांच्या विचारधारेवर चालणारी सर्वसमावेशक भूमिका निभावण्याचा एक भारतीय नागरिक म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. वंचित बहुजन पार्टीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी प्रकाश आंबेडकर तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, नेते आणि समस्त कार्यकर्ते यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
जागावाटपात भिवंडीची सीट राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार या पक्षाला गेल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असहकाराची भूमिका घेतली आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले सांबरे हे जिजाऊ विकास पार्टीतर्फे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत, तर वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभेत आता तिरंगी लढत होणार आहे.
निलेश सांबरे यांनी २००८ साली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी भिवंडी, वाडा, पालघर, कल्याण आणि कळवा या ठिकाणी नुकतेच निर्धार मेळावे घेऊन भिवंडी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. ही निवडणूक लढण्यासाठी त्यांची गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत