आदरणीय बाबू हरदास एल. एन. जन्मदिन

❀ ६ जानेवारी ❀
जन्म – ६ जानेवारी १९०४ (कामठी,नागपूर)
स्मृती – १२ जानेवारी १९३९
‘जयभीम’ चे जनक हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास एल.एन. यांचा जन्म नागपूर मधील कामठी येथे झाला. ते स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी, राजकारणी व समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना जय भीम या अभिवादानाचे जनक मानले जाते. ते कामगारांचे नेते म्हणूनही प्रसिद्ध होते. ते डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सरचिटणीस होते. बाबू हरदास यांचा जन्म नागपूर मधील कामठी येथे ६ जानेवारी १९०४ रोजी एका महार कुटुंबात झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव नगराळे हे रेल्वे खात्यात कारकून होते. बाबू हरदास यांची मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात झाले. त्यांनी नागपूर येथे आर्य समाजाच्या स्वामी ब्रह्मानंद यांच्याकडून संस्कृतचाही अभ्यास केला. त्या काळच्या प्रथांनुसार, वयाच्या सोळाव्या वर्षी, १९२० मध्ये बाबू हरदास यांचा विवाह साहूबाई यांच्याबरोबर झाला. बाबू हरदासांचे आयुष्य त्यांच्या समाजबांधवांमध्ये जागृती करण्याच्या कार्यामुळे बरेच धावपळीत गेले. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांना क्षयरोगाने बाधले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : विकिपीडिया
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत