महाराष्ट्रमुख्यपान

मराठा/कुणबी आरक्षणाच्या आंदोलनास हिंसक वळण, उस्मानाबादेत 30 ऑक्टोबर पासून पुढील आदेशापर्यंत जमावबंदी आदेश !

-पत्रकार : विजय अशोक बनसोडे

उस्मानाबाद (प्रतिनिधी) दि.31 ऑक्टोबर 2023,महाराष्ट्रामध्ये मराठा/कुणबी आरक्षणाच्या आंदोलनास हिंसक वळन लागले आहे.मनोज जरांगे पाटील हे मागच्या सहा दिवसापासून मरण उपोषणाला असून ते सध्या पाणी ही घेत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा/कुणबी आरक्षण आंदोलनाच्या आंदोलनकर्त्यांनी हिंसक भूमिका स्वीकारली असून राज्यात माजी मंत्री,आमदार,कार्यालये, निवासस्थानाला आगी लावणे, परिवहन महामंडळाच्या वाहनांची तोडफोड करणे,अशा हिंसक घटना घडत आहेत. मराठा/कुणबी आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून उस्मानाबाद शहरालगत आणि जिल्ह्यामध्ये परिवहन महामंडळाच्या बसेस वरती दगडफेक करण्यात आली, रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको,अमरण व साखळी उपोषण करून मराठा/कुणबी आरक्षणाच्या आंदोलनाला भक्कम करण्याचं काम चालू आहे.या गंभीर परिस्थितीस लक्ष्यात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 30 ऑक्टोबर 2023 रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी 144 (2) अन्वये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश लागू केला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या परिस्थिती आटोक्यात असून पोलीस बंदोबस्त तगडा असून शाळा, कॉलेजेस,महाविद्यालय यांच्यासह काही आस्थापना पूर्णतः बंद आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!