विदर्भाचे काश्मीर; मराठवाड्यातील शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान.

विदर्भ: मंगळवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह गारपिटीने मराठवाडा, विदर्भाला तडाखा दिला. महाराष्ट्रातील इतर भागात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी पडल्या. अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू ,संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली. गरांचा खाच सगळीकडे जमा झाल्यामुळे विदर्भाला काश्मीरचे स्वरूप आले आहे.
मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसला. रब्बी ज्वारी, गहू, फरदड कापूस, हळद, आंबा, टरबूज आदी फळपिकासंह भाजीपाल्याचे नुकसान झाले. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत रब्बी ज्वारीचे पीक आडवे झाले.
गहू, हळद भिजली. आंबा, टरबूज, संत्रा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. हळद काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतीमालही भिजला. बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तालुक्यात हलका पाऊस झाला.
पश्चिम विदर्भात अवकाळीने धुमाकूळ घालत गहू, लिंबू, आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले. खामगाव तालुक्यात गारपीट झाली. मराठवाड्यातही नांदेड, परभणी, बीड, लातूर जिल्ह्यांत पाऊस झाला आहे. पूर्व विदर्भातील ब्रम्हपूरी (चंद्रपूर), अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत सोमवारी (ता.८) रात्री पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात गारपीट झाल्याने संत्रा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. वरुड, मोर्शी या भागांत मंगळवारी (ता.९) पहाटे गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. त्याचा मोठा फटका संत्रा बागायतदारांना बसला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत