“आपण लढू आणि जिंकू” हा विश्वासच वंचितांचे राजकारण टिकवू शकतो.

जेव्हा जेव्हा वंचित बहुजनांचं राजकारण उभं राहत तेव्हा तेंव्हा ते कश्या पद्धतीने लवकरात लवकर संपवता येईल ह्या कडे प्रस्तापित पक्ष्यांचं लक्ष असत.
उदाहरण :
-सर्वप्रथम, मानसिक खच्चीकरण करणे. त्यासाठी सतत, तुम्ही जिंकू शकत नाही, तुम्ही बी टिम आहात, अशी नकारात्मकता समाजात पसरवणे
-पुढे जाऊन, १-२ जागा देऊ करून तुम्ही खूप छोटे आहात असे निवडणुकी आधीच हीन लेखणे.
सतत कशाचीतरी भीती दाखवणे
-प्रस्थापितांचे पक्षच मुख्य व वंचित घटकांनी राजकारण न करता सतत कोणालातरी सपोर्ट करत राहावं हि अपेक्षा बाळगणे. म्हणजे वंचित बहुजनांचं स्वतंत्र राजकारण नाकारणे.- मीडिया मधून काँग्रेस-भाजप द्विपक्षीय लढत आहे असे दाखवणे, म्हणजे तुमचं अस्थित्व नाकारणे. असा खोडसाळपणा करणारी माध्यम हि कमी नाहीत, त्या द्वारे समाजात एक द्विपक्षीय राजकारण बिंबवत राहणे.ह्यातून बहुजन समाजाने धडा घेऊन, कोणत्याही भूल थापना बळी न पडता स्वतःच राजकारण मोठे करत राहावे. आपण इतर कोणाला हरवण्यासाठी किंवा जिकवण्यासाठीं नाही तर स्वतः जिंकण्यासाठी लढत आहोत हे मनाशी पक्क करून येणाऱ्या आव्हानाला समोर जावे.दोन्ही बाजूने बहुजन राजकरण दाबण्याचे प्रयत्न होतील, आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहून प्रामाणिक प्रयत्न/कष्ट करत राहू.
स्वतः मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपल्या आसपासच्या बहुजना मध्ये आत्मविश्वास निर्माण करून द्या. आपण लढू शकतो, जिंकू शकतो हे त्यांना समजवाउत्तर प्रदेश सारखं देशातील मोठ्या राज्यात ते उभं राहू शकत तर महाराष्ट्रात का नाही? आपल्यातील चमचे ओळखा एखाद्या पदासाठी, स्वार्थासाठी प्रस्थापितांची गुलामी करणारे खरे चळवळींचे मारेकरी आहेत.
आपणच आपल्यासाठी उभं राहू शकतो, इतरांच्या भरोश्यावर किती दिवस लाचारीच जीवन जगणार?जी प्रस्थापित लोक तुम्हाला कवडीही किंमत देत नाहीत, निवडणुकीपुरत फक्त गोड बोलतात त्यांना का मोठं करायचं ? आपल्याकडे वंचित बहुजन समाजाकडे गमवावे असे काहीच नाही. पडण्याची भीती उंचावरच्या लोकांना असते, आपल्या सारख्या मातीतल्या वंचित माणसांना भीती कशाची?
… बहुजन हिताय, बहुजन सुखाय
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत