निवडणूक रणसंग्राम 2024मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

बीड मधून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी ; वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर

बीड : वंचित बहुजन आघाडीने आज बीड लोकसभा मतदार संघातून अशोक हिंगे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. अशोक हिंगे पाटील यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि ग्रामीण भागामध्ये सर्व समाजामध्ये जवळीक असल्याची माहिती आहे.

शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात बीडची उमेदवारी घातली. त्या पाठोपाठच्या वंचितने अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी दिली त्यामुळे दोन्ही पक्षांनी मिळून भाजपा च्या पंकजा मुंडे यांच्याशी लढण्याचा निर्धार केला आहे. अशोक हिंगे पाटील यांच्या उमेदवारीने मात्र निवडणुकीची रंजकता वाढली आहे यात शंका नाही.

वंचितने उमेदवारी दिलेले अशोक हिंगे पाटील सुद्धा जिल्ह्यातील मातब्बर नेते आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आता आघाडीने त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या एन्ट्रीने बीड मतदारसंघातील लढत आता अधिक अटीतटीची होणे अपेक्षित आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!