महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

समदुःखीयांची कैफियत – कवी अशोककुमार उमरे

अमेरिका राष्ट्राध्यक्ष प्रिय बराक ओबामां ! आपण आमच्या बाबासाहेबांना सुर्य म्हणाले आणि आम्हाला धन्य धन्य वाटले |

बाबात विश्व बंधुत्व आणि ज्वलंत देशभक्ती ठासून ठासून भरलेली असतांना सुद्धा भारतातील विद्वान, पंडितांना बाबासाहेब भावले नाही | त्यांच्या विचारांचे- संघटनेचे कधीच मोल करता आले नाही ओबामा !

स्पृश्य- अस्पृश्यतेने कायम परकेपणाची यातना देऊन पदोपदी अपमानित करण्यात आले ओबामा !

सुर्याचा प्रकाश कधीच सापत्न अन् मर्यादित नसतोच मात्र जी उंची बराक ओबामांना कळाली त्याबाबत येथील विकृत मस्तिष्कांच्या खुज्या बुद्धीवंताची झेप गेली नाही यांचे विषाद वाटते ओबामा !

उच्च- निच्चतेचा साक्षात्कार इथे आणि तिथेही त्या व्यवस्थेच्या पारध्याचे शिकार दोघेही सारखेच फरक एवढाच आपण काळ्या- गोऱ्यात आणि आम्ही स्पृश- अस्पृशात भोग भोगले ओबामा !

बाप म्हणायचा,” गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल” त्याचं गुलामीची जाणीव झालेले नरकयातना भोगविणारा पिंजरा तोडून ‘न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्वाचा’ मुक्तविहार करण्यासाठी धडपडणारच ओबामा !

वर्णव्यवस्था समर्थकांनी समानतेची पर्यायी व्यवस्था म्हणून समरसतेचा बागूलबोवा उभा करून जिथे तिथे वर्चस्व निर्माण करण्या एक “संघ” संघटितपणे धुमाकूळ घालतोय यांचे आणखी लाचार अन् गुलाम बनविण्याचे आहे लक्ष्य यापासून सावध राहण्याची रणनीती आखावी म्हणतो ओबामा !

माणसालाच हीन लेखणाऱ्या येथील दांभिक व्यवस्थेने बाबासाहेबांच्या विश्व विकासाच्या योगदानाला सुद्धा मर्यादित करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नाना आक्सफर्ड विद्यापीठाने मेकर्स ऑफ युनिव्हर्सच्या माध्यमातून ” मॅन ऑफ दी मिलेनियम” हा दिलेला पुरस्कार हे समर्पक उत्तर होय ओबामा !

देशासाठी, समाजासाठी, जाती- धर्मासाठी अगणित होतात्म पत्करतात मात्र जागतिक समता शहीद अब्राहम लिंकन सारखे एखादेच निपजतात ओबामा !

तसे पाहता अमेरिकाही लोकसत्ताकवादी आणि बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाची धोरणे तथा मध्यवर्ती गाभा सुद्धा वर्ग, वर्ण, धर्म व रक्त संघर्ष विरहित लोकशाही हाच अंतस्थ हेतू साध्य करणे आहे ओबामा !

बाप म्हणायचा- राजसत्ता अलौकिक रसायन आहे आमच्या लाचारी आणि गुलामगिरीस राजसत्ता हातात नसणे हेचं कारण असून ह्याशिवाय आपला सामाजिक आणि धार्मिक विकास शक्य नाही ही राजसत्ता संघटितरित्या मिळविली पाहिजे ओबामा !

समतेसाठी लढण्यासाठी अविरत परंपरा जी तथागता पासून सुरू असून त्यापैकीच चक्रवर्ती सम्राट अशोक, मार्टीन ल्युथर किंग, मार्क्स, लेनिन, माओत्से तुंग, वाल्टेअर, महात्मा फुले, छत्रपती शाहू, अब्राहम लिंकन इत्यादी हे मानव मुक्तीसाठी लढणारे उद्गातेच ओबामा !

आणि बाबासाहेब तर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वासाठी लढणारे जाती, धर्म, देश, प्रदेश, भाषा पलीकडचे जागतिक लोकसत्ताक चळवळीचे चक्रवर्ती महायोद्धेच होते ओबामा !

असमानतेच्या कक्षा रुंदावत विषवल्ली झाल्याने असमाधानी अन्यायाने क्रोधित होऊन माणसामाणसातील दरी वाढवित चोर पावलांनी शिरणारी आहे आणि माणसावरच अमानुष अधिराज्य गाजवणारी धार्मिक, पारंपरिक, अराजकवाद, दहशतवाद, फुटीरतावाद, विस्तारवाद, शोषण, गुलामगिरी, नक्षलवाद वाढून खऱ्या अर्थाने विषमताच विनाशाकडे नेत आहे, ओबामा !

धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, काळा- गोरा, स्त्री- पुरुष, गरीब- श्रीमंत, शिया- सुन्नी, हिनयान- महायान, प्रोटेस्टंट- रोमन कॅथलीक या व अशा नानाविध संघर्षाची मालिका झुगारून समूळ नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेतील वैश्विक वैचारिक वारसा व तत्वप्रणालीने विश्वाला एका धाग्यात बांधण्याची मैत्री व शांतीची क्षमता असल्याने रिपब्लिकन पक्षासोबतच समता सैनिक दलाला वैश्विक रुप देण्याची गरज आहे, ओबामा !

बाबासाहेब म्हणजे वैश्विक मानव मुक्तीच्या संग्रामातील पणतीने महाकाय झंझावाताशी एकाकी लढलेला अन् जिंकलेला लढाच होता ओबामा !

आपल्या सुधारक बापजाद्याने अविरत संघर्ष अन् खडतर प्रयत्नानी मिळवलेले हक्क आणि अधिकार आपल्याकडे आयते चालून आलीत यांची जाणीव नसलेले बेफिकीर झाल्याने आणखी पेशवाई येण्याची भिती वाटते म्हणून आपल्याकडे समदुःखीयांची कैफियत मांडतो ओबामा !

संवेदना जागृत ठेवून समदुःखी एकत्र येऊन दुःख निवारण्याचे सैनिक होऊन जागतिक समता प्रस्थापित करूच ओबामा !

  • अशोककुमार उमरे,
    8698842402
    रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक,
    निळाई, सिद्धार्थ विहार गडचांदूर, त. कोरपना जि. चंद्रपूर- 442908

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!