निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

ज्यांच्या विरूद्ध आक्रमक भूमिका घेतली होती, आता शिवतारे त्यांचाच प्रचार करणार.

समजूती नंतर शिवतारेंचे बंड थंड

पुणे: लोकसभा 2024 च्या रिंगणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना दिसत आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे सिध्द करत बारामती लोकसभेसाठी एकेकाळी अजित पवार यांच्या विरोधात अस्त्र उगारलेले विजय शिवतारे आता मात्र वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी त्यांनी येत्या गुरवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे.

इतके ज्येष्ठ नेते, इतका टोकाचा विरोध करतात आणि वरिष्ठांनी समजूत घातली की आता डायरेक्ट प्रचार करण्याची तयारी दर्शवतात हे पाहून सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की समजूत काढताना नेमके काय सांगत बोलत असतील ?!

दरम्यान शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्यावरही मोठी टीका झाली होती. अगदी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवातरे यांना खडेबोल सुनावले होते. आता येत्या गुरुवारच्या सभेत नेते नेमके काय विचार मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!