मुंबई/कोंकण
मुंबईसह ठाणे पालघर परिसरात पावसाची दमदार हजेरी

सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवस पाऊसच नसल्याने जिल्ह्यातील भात शेती संकटात सापडली होती पावसामुळं पालघर जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.पावसामुळं उष्णता कमी झाली आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत