वंचित बहुजन आघाडीने हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना दिली उमेदवारी; परभणी मधून अर्ज दाखल.
परभणी : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तर्फे परभणी लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यात आला असून आज त्यांनी रीतसर उमेदवारी अर्ज भरला. बुधवारी बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र जनमत घेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वंचित चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार बदलला व आज गुरुवारी ४ एप्रिल रोजी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या नावाची घोषणा झाली. गुरुवारी डख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
डख यांच्या उमेदवारीचे वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. पंजाबराव डख हे हवामान अभ्यासक असल्यामुळे ते शेतकऱ्यांच्या घराघरात पोहचलेले आहेत. लोकसभा मतदार संघासह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही ते परिचित आहेत. त्यामुळे पंजाबराव डख हे निर्णायक मते घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत