शाहू महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट – सतेज पाटील यांनी दाखल केली तक्रार

कोल्हापूर : कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. उघड उघड विरोध करण्याऐवजी छुप्या पद्धतीने सोशल मिडीयाचा वापर करून यांच्या विरोधात समाज माध्यमात आक्षेपार्ह संदेश पसरवला जात आहे. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे मतदारसंघातील वातावरण तापले आहे.
कोल्हापुरात शाहू छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला आहे. एकमेकांच्या नेत्यावर टीका होऊ लागली आहे. या अंतर्गत महायुतीकडून समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या संदेशमध्ये शाहू महाराज यांच्या विरोधात चुकीचा संदेश अग्रेषित केला असल्याने त्याबाबत पोलिसांत तक्रार दिली असल्याचे सतेज पाटील यांनी सोमवारी सांगितले.
शाहू महाराज आणि त्यांच्या विचारसरणीला बदनाम करणारे हे संदेश आहेत. यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे आमदार पाटील यांच्या पत्रात म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत