आरोग्यविषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपान

भारतातील १४० कोटी जनतेचे आरोग्य धोक्यात!

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
मंगळवार दि. २ एप्रिल २०२४.
मो.नं. 8888182324.

           माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आधीच भेसळयुक्त वस्तूंच्या सेवनामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. सरकार जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत उदसिन आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे कित्येक रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. आणि आता तर जे रुग्ण स्वतःचा उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात त्यांचेही आरोग्य धोक्यातच आले आहे. कारण, रुग्ण जी औषधे खरेदी करतात ती किती विश्वासार्ह आहेत यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ज्या औषधांच्या (फार्मा) कंपन्या बॅन केल्या होत्या, ईडी, सीबीआयने त्यांच्यावर छापे मारले होते, तसेच कित्येक कंपन्यांची चौकशी सुरु होती. अशा सर्वच कंपन्यांच्या चौकशा अचानक बंद करण्यात आल्या? या सर्व २३ संशयीत फार्मा कंपन्यांनी ७६२ करोड रुपयांचे इलेक्ट्रोरल बाॅण्ड खरेदी करुन ते भाजपला दिले आहे. औषधांच्या टेस्ट मध्ये फेल झालेल्या या सर्व कंपन्या पुन्हा सुरु झाल्यामुळे देशातील १४० कोटी जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

           देशात १ एप्रिल २०२४ पासून ३८४ हून अधिक औषधे महाग झाली आहेत. आता लोकांना अँटीबायोटिक्सपासून ते पेनकिलरपर्यंत अशा सर्व औषधांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. कॅन्सर, ह्रदयविकार, अँनिमिया, मलेरिया, अँटी सेप्टिक यासह अनेक औषधे १ एप्रिलपासून नवीन दरात उपलब्ध होणार आहेत. महाग झालेल्या औषधांमध्ये व्हिटॅमिन गोळ्या, स्टिराॅइड्स, पेन किलर, टी.बी., कॅन्सर, मलेरिया, एच.आय.व्ही, त्वचा रोग, ह्रदयविकाराची औषधे, प्लाझ्मा, जंतुनाशके इत्यादी औषधांचा समावेश आहे. सरकारने बॅन केलेल्या आणि चौकशी सुरु असलेल्या सर्व फार्मा कंपन्यांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने इलेक्टोरल बाॅण्ड घेऊन त्यांना नियमबाह्य १० टक्के एवजी १२ टक्के दर वाढविण्याची परवानगी दिली आहे. दर तर वाढलेच पण त्या कंपन्यांची औषधे आरोग्यास अपायकारक नसतील हे कशावरुन? औषधांच्या टेस्टमध्ये फेल झाल्यामुळेच सरकारने त्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता ना? मग आता त्या कंपन्या ड्युप्लिकेट औषधे देणार नाहीत कशावरून? सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे देशातील १४० कोटी जनतेचे आरोग्यच धोक्यात आले आहे हे नक्की.

           बॅन केलेल्या आणि चौकशी सुरु असलेल्या कंपन्यांमध्ये सीपला लिमिटेड, सन फार्मा लिमिटेड, जाइड्स हेल्थकेअर लिमिटेड, टोरेंट फार्मास्युटिकल लिमिटेड, हेटेरो ड्रग्स लिमिटेड, इंटास फार्मास्युटिकल लिमिटेड, आईपीसीए लॅबोरेटीज लिमिटेड, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल, यशोदा सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल, डाॅ. रेड्डीज लॅब आणि अरबिंदो फार्मा इत्यादी २३ मातब्बर कंपन्यांनी ७६२ कोटी रूपयांचे इलेक्टोरल बाॅण्ड खरेदी करुन भाजपला दिले आहेत. कोरोना काळात आदर पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या कोविशिल्ड लसीला परवानगी कशी मिळाली? याचा भांडाफोड त्या कंपनीने ५०२ कोटी रुपये इलेक्टोरल बाॅण्ड खरेदी केले होते यावरून नुकताच सिध्द झाला आहे. ही अतिशय धक्कादायक बाब असून मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. केंद्र सरकाने पैसे कमाविण्यासाठी देशातील १४० कोटी जनतेचे आयुष्य उध्वस्त करायला घेतले आहे. येत्या काळात औषधाविना रूग्ण तर दगावतीलच, पण महागडी औषधे खरेदी करूनही किती रुग्णांचे प्राण वाचतील हे येणारा काळच ठरवेल? कारण, खरेदी केलेली औषधे किती विश्वासार्ह आहेत यावरच रुग्णांचे जीव अवलंबून असेल!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!