महार समाजाचा शिवकाळ व पेशवाईतील शूरवीरांचा इतिहास


1) सातवहान राजवटीत नाव=महारक्ख ते महारक्षक ( महार).
2)मोगलांशी झुंज देवून वैराटगड जिंकणारा= नागनाक महार नागेवाडी वाई सातारा. छत्रपती राजाराम यांनी दिलेले इनाम= पाटील की नागेवाडी गाव हे वतन म्हणून देण्यात आले.
3) जीवाजी महाराची कामगिरी= प्रतापगडच्या सुभान खान व बेदरच्या अब्दुल शहाचे बंड शमवले. बंगालच्या वाघास पिंजर्यात बंद करून आणले(आठ परगण्याची सरनाईक की)म्हणून बक्षीस दिले.
4) वाल्हे येथील महारांची कामगिरी= श्री शिवाजी महाराजांची कन्या सखुबाई एकदा संकट कोसळले असता तिचे रक्षण केले.
5) रायनाक महार= दुसर्या बाजीरावाच्या काळात रायगड किल्ल्याचा किल्लेदार (इंग्रजांशी लढताना ठार).
6) सिद्धनाक पहिला= बहमनी राज्याचे सेनापती होते.
7) सिद्धनाक महाराचा नातू तिसरा (सिदनाक महार उर्फ सिद्धनाक बाजी हा होय)= छत्रपती शिवाजी महाराजांना वाई प्रांतात लष्करी मदत, जावळीच्या चंद्रराव मोरया’च्या पाडव करण्यास मदत.
8) सिद्धनाक 3रा उर्फ सिद्धनाक बाजी=अफजल खानाच्या वधानंतर प्रताप गडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत मोठा पराक्रम दाखवला.
9) तिसऱ्या सिद्धनाक याचा मुलगा कृष्णनाक महार= वाई प्रांतात मराठा व मोगल लढाईत ठार झाला.
10) पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार= चीव्हे नाईक (महार) रा. ठी.अवसरी ता. पुरंदर जि.पुणे.
11) प्रत्येक किल्ल्यावरील मेटनाइकी=त्यात महार समाजाचा भरणा जास्त होता.
12) सातारा किल्ला मेटनाइकी=महादनाक कलद राजनाक महार यांचेकडे होते.
13) महार समाजाची लष्करी पथके= हुलस्वार पथक, पायदळ, किल्लेदार मेटनाइकी, अंगरक्षक.
14) शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे भगवे निशान तयार करून देणार, सातारा सदाशिव पेट ढाले पणाचे वतन देण्यात आले=महादनाक सरदार.
15) छत्रपती शाहू यांस सातारच्या गादीवर बसविण्यास मदत= सिद्धनाक महार तिसरा कळम (कळकी) हे गाव इनाम (वतन) देण्यात आले.
16) सण 1659 साली बाजी पासलकर यांनी शौर्य गाजवून सिधीचा तालिबानी राजवटीचा पराभव केला त्यांचा अंगरक्षक=खंड्या महार ( अंगरक्षक)
17) वसईच्या रणसंग्राम महारांची कामगिरी
(युद्धाचे सामान पाण्यातून युद्धाचे ठिकाणी पोहोचवण्याचे अवघड काम केले)= तुकनाक महार याने मांडवी कडील मोर्चा संभाळून टक्कर दिली त्यावेळी त्याचा गौरव करण्यात आला, सोन्याचे कडे बक्षीस देण्यात आले.
18) खरड्याची लढाई व सिद्धनाक महार चौथा (शेवटचा) सरदार-परशुरामभाऊ पटवर्धन यांचे प्राण वाचविले =मराठे व निजाम 11मार्च 1715 रोजी आपल्या पथकासह लढाईत शौर्य दाखवले यात निजामचा पराभव झाला.
19) रायप्पा महार= लाखोंच्या फौजेत घुसून
शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न रायप्पा महार यांनी केला व स्वतःचे बलिदान दिले.
20) धोंडनाक सरदार=(कोंडाणा किल्ल्यावरील ‘महार’ वीरांची कर्तबगारी)= मुघलांच्या ताब्यातील कोंडाणा किल्ला सण 6 फेब्रुवारी 1670 घनघोर लढाईत सहभाग.
21) मिरज जवळील कळंबीचे सिद्धनाक सरदार= सण 1761 साली तिसऱ्या पानिपतच्या लढाईत होते आणि त्यांना शुरवीर मरण आले( मिरज इतिहास संशोधन मंडळ) (इतिहासकार – मानसिंग कुमठेकर सांगली) व हुलस्वार पथकासह सहभागी झाले होते.
22) विठू (महार)= आदिलशहाच्या कैदेत असलेले दामाजी पंत यांची सुटका करून त्याच्या मोबदल्यात सोन्याच्या मोहरा विठू महार यांनी दिल्या.
23) मदारी मेहत्तर= औरंगजेबाच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज यांना सोडवण्यासाठी मदत केली व आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
24)गोविंद गोपाळ महार= वडू बुदृक भिमा कोरेगाव येथे संभाजी महाराजांची समाधी बांधण्यास जागा दिली व महार वाड्यात छत्रपती शाहू महाराज यांनी समाधीस बांधल्या बद्दल त्यांना सनद देऊन जमीन ईनाम म्हणून देण्यात आली.
25)नागनाक सरदार= मुघलांच्या ताब्यात असलेला वैराटगड जिंकून स्वराज्यात सामील केला. छत्रपती राजाराम यांनी वैराट गड जिंकून दिल्याबद्दल नागनाक यास नागेवाडी हे गाव इनाम म्हणून देण्यात आले व पाटील की बक्षीस देण्यात आली.
[लेखक= डॉ. अनिल कटारे, संजय सोनवणी, सर चिंतामण मोरे, डॉ. कैलास फुलमाळी, डॉक्टर कृष्णकांत क. डोंगरे, डॉ. पी.ए. गवळी, चांगदेव भ. खैरमोडे,प्रो. विलास खरात,विश्वास पाटील ( पानिपत कार).]
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत