धनराज गोंडाने “मिलिंद सन्मान” पुरस्काराने सन्मानित.
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी)
नागसेन फेस्टिवलच्या वतीने देण्यात येणारा मिलिंद सन्मान पुरस्कार २०२४, हा पुरस्कार बौद्ध साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनराज गोंडाने यांना नागसेन वन परिसरात मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी मंचावर भवंर मेघवंशी (राजस्थान ) पत्रकार संजय पवार, अनिल साबळे, डॉ. प्रमोद दुथडे, सचिन निकम, प्रा. किशोर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. गोंडाने यांनी सामाजिक कार्य, बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार, २२ प्रतिज्ञाचे मुख्य प्रचारक म्हणून कार्य केले आहे. तसेच फुले, शाहू,आंबेडकर यांच्या जीवनावर साहित्य लेखन सुद्धा प्रकाशित झालेले आहे.
बोधी वृक्षाची पाने हा त्यांचा ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार आहे. सामाजिक,धार्मिक विविध विषयावर साप्ताहिक, दैनिकात सातत्याने त्यांचे लेखन सुरू आहे. त्यांच्या आजपर्यंत कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संघटना, संस्थाकडून २३ पुरस्कार मिळालेले आहे.त्यांचे कार्य सतत चालू आहे. प्रत्येक सांस्कृतिक,सामाजिक कार्यक्रमांमध्ये सामाजिक बांधिलकी जपत तें हजर असतात. हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. रतन कुमार साळवे, (संपादक -निळे प्रतीक) डॉ.सागर चक्रनारायण, देवानंद वानखेडे,संजय मोहोड, शरद पगारे, भदंत करूनानंद थेरो, डॉ.एम सत्यपाल,चंद्रशेखर गजभिये, भदंत,ज्ञानरक्षित थेंरो, डॉ. संगीता डोंगरे,कमलाकर साबळे, बाबुराव बनसोडे, भीमराव धाकडे, आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत