महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिकसामाजिक / सांस्कृतिक

दहा हजार स्पर्धक सोडविणार भीमस्मृती ज्ञान चाचणी


नांदेड (प्रतिनिधी) : मुलांना नाचण्याकडून वाचनाकडे वळविण्यासाठीचा एक उपक्रम म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तर जिल्हास्तरीय भीमस्मृती ज्ञानचाचणी २०२४ आयोजित करण्यात आली आहे. त्यात गट १ ला – ५ वी ते ८ वी, गट २ रा – ९ वी ते १२ वी, गट ३ रा – डिग्रीच्या पुढे असे असणार आहे.

प्रत्येक गटासाठी पहिले बक्षीस १००० रूपये, दुसरे बक्षीस ७००, तिसरे बक्षीस ५००, उत्तेजनार्थ बक्षीस २५० असे असेल. वसंत मून, चांगदेव खैरमोडे, बी.सी. कांबळे लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रावर ही ५० प्रश्नांची चाचणी असून, प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण असतील. दि. ७ एप्रिल रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाईल. दि. २१ एप्रिल रोजी एका भव्य कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाईल.

नाव नोंदणीसाठी संपर्क ईश्वरराव जोंधळे
९८६०४६११५९, कांबळे ८८८८१२७४३५, संभाजी सोनकांबळे ९००४११२९९५, कैलास पोहरे ९७६३३६२१९२, अंबादास कांबळे ७७६८८२३६६३, गणपत गायकवाड ९५२७८८१९०१, डॉ. भीमराव वनंजे ८०८७४७७५३८ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन गणपत गायकवाड तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर यांनी केले आहे.

नागोराव माधवराव लोखंडे पिंगळीकर यांच्या स्मरणार्थ, सुजाता महेंद्र नरवाडे किनवट, डॉ. महेंद्र बबनराव घोडगे, लक्ष्मणराव बेलाजी सावळे, भैयासाहेब आंबेडकरनगर देगाव चाळ यांच्या स्मरणार्थ, मुक्ताबाई लक्ष्मणराव सावळे भैयासाहेब आंबेडकर नगर देगांव चाळ यांच्या स्मरणार्थ, राहुल ग्यानोबाराव वाठोरे सहशिक्षक पंचशील विद्यार्जन हायस्कूल हदगाव, उत्तेजनार्थ बक्षीस २५० रूपये रमेश दूधमल, प्रथम बक्षीस १००० रूपये पार्वती चंदर सोनकांबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, दुसरे बक्षीस ७०० रूपये प्राचार्य राजाराम वाघमारे महात्मा फुले महाविद्यालय किनवट, बक्षीस ५०० रूपये, डॉ. संदेश संभाजीराव वाठोरे आस्था क्लिनिक पासदगाव, उत्तेजनार्थ बक्षीस १५० रूपये, लता गोविंदराव गायकवाड, उत्तेजनार्थ बक्षीस २०० रूपये स्मृतीशेष सरस्वतीबाई माधवराव महाबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उपासिका रेखाताई पंडीत जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा महिला विभाग नांदेड उत्तर युच्याकडून प्रत्येक गटासाठी, बहुजन शिक्षण प्रसारक मंडळ वलंकीचे नालंदा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटतर्फे पहिल्या गटातील पहिले बक्षीस १५०० रूपये स्मृतिशेष हरणाबाई गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दुसऱ्या गटातील पहिले बक्षीस १५०० रूपये, स्मृतिशेष धोंडीबा गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तिसऱ्या गटातील पहिले बक्षीस १५०० रूपये देण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!