बाळासाहेब आंबेडकर आणि मनोज जरांगेंची भेट- आज पत्रकार परिषदेत करणार भूमिका स्पष्ट

अकोला: वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीबद्दलची त्यांची भूमिका आज जाहीर करतील. काल दिवसभर अकोल्यातील आंबेडकरांच्या ‘यशवंत भवन’मध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. आंबेडकर आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करतील.
सध्याच्या घडीला आंबेडकर यांच्यापुढे तीन पर्याय खुले आहेत. मविआसोबत जाण्याचा, स्वतंत्र लढण्याचा आणि काही छोट्या पक्षांच्या साथीनं तिसरी आघाडी स्थापन करण्याचे पर्याय आंबेडकर यांच्याकडे आहे. डावे पक्ष, प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी पक्ष यांच्या मदतीनं तिसरी आघाडी तयार करण्याचा पर्याय आंबेडकरांकडे आहे. तसं झाल्यास मागील निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ शकते. गेल्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची आघाडी होती. त्याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादीला ६ ते ७ जागांवर बसला होता.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं दिलेला प्रस्ताव मान्य करावा, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना केलं आहे. महाविकास आघाडीनं वंचितला ४ जागांचा प्रस्ताव दिला होता. पण वंचितनं हा प्रस्ताव फेटाळला. आता मविआनं वंचितला ५ जागांचा नवा प्रस्ताव दिला आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत