नवनीत राणा यांना तिकीट दिलं तर युतीतून बाहेर पडणार ! आमदार बच्चू कडू यांचा शिंदेंना गंभीर इशारा

अमरावती : खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणातील वादग्रस्त खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती लोकसभेच्या जागेवरुन वाद विवाद होताना पहायला मिळत आहे. याबाबत माजी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ आणि मित्रपक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी जर विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली, तर महायुतीतून बाहेर पडण्यासाठी संमती द्यावी, अशी मागणी केली असल्याचं खुद्द बच्चू कडू यांनी सांगितलं.
राणा उमेदवार असतील, तर आम्हाला बंड करावं लागेल. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच त्या उमेदवार असतील तर आम्हाला युतीतून बाहेर पडण्याची संमती द्या, असं मत आम्ही मांडलं.
राणा यांच्याबाबत मोठी नाराजी आहे. जर आम्ही त्यांच्यासोबत राहिलो तर प्रहार राहणार नाही. आमचा पक्ष फुटेल. आम्हाला काम करता येणार नाही, असं मत व्यक्त करतानाच जर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर आम्ही आमचा अपक्ष उमेदवार उभा करून मैत्रीपूर्ण लढत लढू, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. त्यामुळे नवनीत राणांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याच्या शक्यतेवरून अमरावतीत महाभारत रंगलं असल्याचं पहायला मिळत आहे.
तसेच यावेळी आनंदराव अडसूळ यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नवनीत राणा यांच्या कार्यपद्धती बद्दल तक्रार केली. यावर ४ एप्रिल रोजी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांना दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत