
केरळ: 23/11/2023
भारताच्या पहिला महिला जज अर्थात जस्टिस एम. फातिमा बिवी यांचं निधन झालं. त्या ९६ वर्षांच्या होत्या. देशातल्या महिलांसाठी त्या आदर्श ठरल्या. तसंच त्यांची वकिली क्षेत्रातली कामगिरीही उल्लेखनीय ठरली. केरळच्या पंडालममध्ये राहणाऱ्या जस्टिस बिवी यांनी तिरुवनंतपुरममधून विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्याआधी त्या पथनामथिट्टा कॅथलिक शाळेत होत्या. त्यानंतर त्यांनी सरकारी विधी महाविद्यालयातून वकिलीची पदवी घेतली.
१४ नोव्हेंबर १९५० या दिवशी त्या वकील झाल्या. १९५० मध्ये केरळच्या कनिष्ठ न्यायालयातून त्यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या वकील म्हणून प्रगती करत गेल्या. मॅजिस्ट्रेट आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशही झाल्या. १९८३ मध्ये त्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झाल्या तर १९८९ मध्ये सर्वोच न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून त्यांनी नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून जेव्हा त्या निवृत्त झाल्या त्यानंतर त्या तामिळनाडूच्या राज्यपालपदीही विराजमान झाल्या होत्या. राजकीय क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत