जेट एअरवेजचे नरेश गोयल यांना कॅनरा बँक ५३८ कोटी फसवणूक प्रकरणी ‘ईडी’ कडून अटक

मुंबई : कॅनरा बँक ५३८ कोटी फसवणूक प्रकरणी तसेच बँक कर्ज बुडवल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ‘ईडी’ कडून अटक केली.
कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) याप्रकरणी ३ मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. कॅनरा बँकेचे कर्जवसुली व कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी २३ नोव्हेंबर, २०२२ ला सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यात आरोपींनी फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने मुंबईतील सात ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. त्या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडी तपास करत असून त्याबाबत ईडीने ही चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत