महाराष्ट्रमुख्यपानराजकीयवातावरण

अरविंद केजरीवाल यांना अटक; ED ची आणखी एक लाजिरवाणी कृती

पदावर असताना अटक झालेले पहिलेच मुख्यमंत्री !

दिल्ली : देशात विरोधक संपवण्याचे भाजपा चे लक्ष पूर्ण करण्यासाठी जनभावनेची कसलीही तमा न बाळगता बेभान काम करणाऱ्या ED च्या कर्तृत्वात आणखी एक भर पडली आहे. भाजपा ला राजधानी दिल्लीच्या निवडणुकात सलग तीनदा धूळ चारणाऱे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी ईडीकडून (प्रवर्तन निदेशनालय) अटक करण्यात आली.

या अटकेनंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. देशाच्या राजकारणातील गेल्या काही वर्षांपासूनची भाजपची भूमिका आणि एकंदर निर्माण केलेली परिस्थिती पाहता विरोधी बाकावर बसणाऱ्या अनेक नेत्यांनी भाजपवर घणाघात केला. काहींनी तर, देशातून भाजप सरकार हटवण्याचीही मागणी केली. काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा यात मागे राहिले नाहीत.

INDIA आघाडीमध्ये सहभागी झालेल्या आणि काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचं वृत्त कळताच X च्या माध्यमातून बोचऱ्या शब्दांत भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला. “भयभीत हुकूमशाहा, एक मृतावस्थेतील लोकशाही बनवू पाहतोय. माध्यमांसह इतर सर्व संस्थांवर ताबा घेणं, पक्षांमध्ये दुफळी माजवणं, कंपन्यांकडून हफ्ता वसूल करणं, मुख्य विरोधी पक्षाची खाती गोठवणं हे सारंकाही या असुरी शक्तीसाठी काय कमी होतं, की आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक होणं ही बाबही अतिसामान्य झाली आहे…. INDIA याचं सडेतोड उत्तर दिल्यावाचून राहणार नाही.’ अस मत त्यांनी मांडल.

लोकशाही संवर्धनासाठी व येणाऱ्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी RSS भाजपा आणि इतर मनुवादी शक्तींना सत्तेपासून रोखणे ही आता काळाची गरज बनली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!