अनेक जाती जातींना पाणी पिण्याची मुभा नव्हती ! महाड सत्याग्रहाची 97 वर्ष

फक्त बौद्ध समाजाला नाही तर तमाम हिंदू धर्माने शूद्र समझल्या गेलेल्या अनेक जाती जातींना पाणी पिण्याची मुभा नव्हती !
पण आज एका महाडच्या संघर्षाने प्रत्येकाच्या घरात गोड्या पाण्याच्या हजार लिटर च्या सिंटेक्स च्या टाक्या आहेत !
20 रुपयात घेतलेली बिस्लेरी ची मिनरल पाण्याची बाटली कोणाच्या हातात दिसली तर त्याला हल्ली कोणी तुझी जात कोणती हे विचारत नाही !
पण आजही 97 वर्ष महाड सत्याग्रहाला होऊन आणि देशाला स्वतंत्र होऊन 77 वर्ष आणि प्रजासत्ताक होऊन 74 वर्ष झाली.. तरी देखील भारतातील अशा अनेक ठिकाणी पाण्यावाचून जीव गेलेले आणि पाण्यासाठी तरफडणारे लोक आहेत !
भारतातील 70 वर्षाच्या राजकारणात एक एक अनेक राजकारणी झाले आणि गेले देखील पण पुनः येथे पाण्यावाचून संघर्ष झालेला दिसला नाही ! खाजगी कंपन्या आणि केमिकल कारखान्यांना मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याच्या पाईपलाईन पुरवल्या गेल्यापण जिथून मुंबई सारख्या बड्या शहराला पाणीपुरवठा होतो त्या अनेक तलावां बाजूच्या गावांना आदिवासी पाड्यांना कोरड सोसावी लागतेय !
ह्या आदिवासी पाड्यांना पुनः कुठल्या आंबेडकर ची गरज आहे असेच भासतेय! कारण रोज शॉवर खाली अंघोळ करणाऱ्यांना त्यांची कधी याद असेल हो?
जगात अनेक ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्याला गोड्या पाण्यात बदलण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत त्यावर प्रयत्न केले जातायत पण भारत मात्र ह्याला अपवाद आहे!
बुद्धाच्या वेळेस झालेला रोहिणी नदीचा वाद नंतर तुकारामाच्या काळात पडलेला दुष्काळ आणि त्यानंतर शूद्र हिणवुन पाण्यावाचून केलेली अवहेलना लथाडून बाबासाहेबांनी केलेला महाड चवदार तळ्याचा पाण्यासाठीचा संघर्ष इतके ह्याच देशात झाले तरीही ह्या देशाला लाज वाटू नये !
ह्या पाण्याच्या प्रश्नामुळेच बाबासाहेबांनी नदया कालवे जोडो प्रकल्प योजिला होता !
परंतु त्यांच्या ह्या दुरदृष्टीला येथील राज्यकर्त्यांनी अम्हलबजावणीमध्ये कधी आणलेच नाही ! त्यामुळेच प्रत्येक उन्हाळ्यात आज विदर्भच नाही तर देशभरात दुष्काळाला सामोरे जावे लागते !
तो दिवस दूर नाही जेव्हा ह्या पृथ्वीवर पाण्यावाचून पुनः मोठ्या युद्धाला पत्करून ही पृथ्वी नष्ट होईल !
माणसाच्या मूलभूत गरजेसाठी…
पाण्यासाठी !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत