संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – १९

गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प १९
भेष लियो पै भेद न जान्यो!
अमृत लेइ विषै सो मान्यो !!
काम क्रोध में जनम गॅवायो!
साधु संगति मिलि राम न गायो !!
तिलक दियो पै तपनि न जाई !
माला पहिरे धनारी लाई!
कह रैदास मरम जो पाऊॅ!
देव निरंजन सत कर ध्याऊॅ!!
या पदावलीत गुरू रविदास अवंडबरावर बोट ठेवून कर्मकांडावर लिहतात …
भगवे, हिरवे ,पिवळे, रंगीत कपडे घालून साधू मुनीचा वेष तु धारण केला.संन्यास घेतला .याग धाम केले पण जे खरे रहस्य हे तूला समजलेच नाही. दुखी कष्टी असतानाही तुझ्या जिभेत अमृताचा गोडवे असताना ही तू अमृतावर विश्वास ठेवला नाही. विषावर विश्वास ठेवून बसलास.काम क्रोधात रमून ऊभे आयुष्य घालविले.तरीही तुला सुखाचे रहस्य समजले नाही. तुला साधू सज्जनांची मैत्री संगत मिळाली पण तुला अमृतातला राम गाता आला नाही..!शांतीच्या अपेक्षाने कपाळावर टिळा बुका, गंध ,लावला .माळा घातल्या परंतू तपनि म्हणजे जगाचा ताप काही संपला नाही. सुखासाठी धनसंचय केला पण सुख मिळाले नाही.तुझ्या सूखाचा शोध संपवण्यासाठी मला जे मर्म सापडले आहे ते मी तूला सागतो आहे. ऐक.. मी त्या निरंजनाची फक्त मनापासून नित्य आराधना करतो .ध्यान करतो. तू ही कर्मकांड अवडंबर न करता शुद्ध मनाने आराधना कर तु दुख मुक्त होशील._
जय रविदास
लेखक ,ॲड.आनंद गवळी
(पदावल्या मला पाठ नाहीत त्या जश्या समजल्या त्या भावार्थाने लिहल्या आहेत .जिज्ञासूंनी प्रतिक्रिया दिल्यास स्वागत त्यांचे स्वागत करतो. येत्या रविदास जयंती पर्यंत भावार्थ लिहण्याचा प्रयत्न करणार आहे.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत