दिन विशेषदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

राष्ट्रपती , उद्योगपती मैत्रीविरुद्धअमेरिकन रस्त्यावर !

🌻रणजित मेश्राम : लेखक जेष्ठ अभ्यासक विचारवंत साहित्यिक समीक्षक आहेत

जगात पहिल्यांदाच असे घडले. सत्ताधारी व त्याचा अब्जाधीश मित्र या दोघांच्या विरुद्ध एखाद्या देशात आंदोलन व्हावे. परवा अमेरिकेत असे घडले.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व त्यांचा उद्योगपती मित्र एलन मस्क या दोघांच्याही विरुद्ध एकाच दिवशी रविवारी अमेरिकेत देशव्यापी आंदोलन झाले.

आंदोलन फार तीव्र होते. सर्वत्र रोष व्यक्त करण्यात आला. हे दोघे मिळून अमेरिकेची महान लोकशाही धोक्यात आणत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.

अमेरिकेतील १५० संघटनांनी संयुक्तरित्या निषेध नोंदविला. वाॅशिंग्टन , न्यूयॉर्क, ह्युस्टन, फ्लोरिडा, कोलोरॅडो, लाॅसएंजिल या शहरांसह ५० राज्यात रस्त्यावर निदर्शने झाली. ठिकठिकाणी १२०० मोर्चे काढण्यात आले. या आंदोलनात कामगार संघटना, नागरी हक्क संघटना, विद्यार्थी संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. राष्ट्र राजधानी, राज्य राजधानी येथे आंदोलनाची तीव्रता अधिक होती. लाखो अमेरिकी नागरिक यादिवशी संविधानिक निषेध नोंदवित रस्त्यावर उतरले. निदर्शकांच्या हातात डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांचे छायाचित्रासह निषेध करणारे फलक होते.

सध्या दोघांच्याही मैत्रीची अमेरिकेत चविष्ट चर्चा आहे. ५३ वर्षाच्या एलन मस्क बाबत आपण खूप प्रभावित असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा जाहीररीत्या सांगितले आहे. एलन मस्क आजघडीला अंतराळ तज्ञ म्हणून गणले जातात. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशीही ओळख आहे. एलन मस्क एका दिवसात २२.३ अरब डाॅलर कमवितात, असेही सांगण्यात येते. तसे स्वतः डोनाल्ड ट्रम्प हे उद्योजक मानसिकतेचे आहेत. आधी तेसुद्धा उद्योगपती होते.
२०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीत एलन मस्क यांनी ट्रम्प यांचा खुल्यारुपाने प्रचार केला. तेव्हापासून ट्रम्प हे मस्कच्या प्रेमात पडले.

गेल्या राष्ट्रपती निवडणुकीपासून डोनाल्ड ट्रम्प व एलन मस्क यांची दोस्ती झाली. ती दोस्ती वाढत गेली. राज्यकारभारात मार्गदर्शन वा सहभाग इथपर्यंत ती वाढली. अमेरिकनांना ते दिसत गेले.

२०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीत रिपब्लिकनचे ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिकच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. तेव्हा ते दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाले. त्या निवडणुकीत एलन मस्क यांनी ट्रम्प यांचा जोरदार प्रचार केला. काही प्रसंगात तर ते दोघेही संयुक्तरित्या एकत्रित प्रचारावर होते.
आज डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती आहेत. २०१६ ला पहिल्यांदा राष्ट्रपती झाले तेव्हा हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. नंतर २०२० ला ज्यो बायडेन यांचेकडून पराभूत झाले होते.
आज डोनाल्ड ट्रम्प हे ७८ वर्षाचे आहेत.

ट्रम्प आणि मस्क यांची धोरणे देशाला घातक ठरतील हे वाटणे यातून या आंदोलनाचा उद्रेक झाला. अमेरिकेत नागरिक आणि नागरिक हित याबाबत अमेरिकन फार सावध व जबाबदार असतात. तिथे त्या मुद्यावर लवकर एक होतात.
अमेरिकेत नव्याने स्वीकारलेल्या धोरणानुसार सरकारी खर्चात कपात करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे, सामान्य नागरिकांना किफायतशीर दरात जीवनावश्यक सेवा प्रदान करणाऱ्या ‘सोशल सिक्युरिटी’ सारख्या योजना बंद करणे, आरोग्य योजनेवरील खर्च कमी करणे अशा अनेक निर्णयांमुळे अमेरिकनांत रोष वाढला. यासर्व बाबतीत एलन मस्क यांचा हस्तक्षेप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सरकारी खर्च कमी करून आपण करदात्यांचे पैसे वाचवत असल्याचा एलन मस्क यांचा दावा अमेरिकन नागरिकांना संतापजनक वाटला. त्यातून हा संघटित रोष व्यक्त झाला.
सर्व आणि सर्वत्र रोष लक्षात घेता व्हाईट हाऊसने निवेदन जारी करुन, सोशल सिक्युरिटी, मेडिकाएड, मेडिकेअर या योजना आधीप्रमाणे सुरु राहतील हे स्पष्ट केले.
अर्थात उद्योगपतीचा राज्यकारभारात हस्तक्षेप आम्ही अजिबात मान्य करीत नाही अशी अमेरिकनांची एकमुखी मागणी कायम आहे.

दरम्यान एलन मस्क यांनी आपले प्रचंड मोठे आर्थिक साम्राज्य उभे केले आहे. याक्षणी एलन मस्क हे बऱ्याच नामांकित कंपन्यांचे मालक आहेत. ती यादी खालीलप्रमाणे सांगता येईल.टेस्ला (Tesla) इलेक्ट्रिक कार आणि उर्जा कंपनी

स्पेस एक्स (Space X) अंतरिक्ष अन्वेषण व राॅकेट निर्माण
टविटर (X) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
न्युरोलिंक (Neuro link) न्युरोटेक्नालाजी
द बोरिंग (The Boring) सुरुंग निर्माण कंपनी
ओपन आय (Open AI) कृत्रिम बुद्धिमत्ता शोध व विकास
एक्स आय (XAI) कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप
पे पाल (PayPal) आँनलाईन भुगतान सेवा
सोलार सिटी (Solar City) सौर उर्जा कंपनी
जिप 2 ( Zip 2)वेब साफ्टवेअर कंपनी
अलीकडे एलन मस्क हा मंगळ या ग्रहावर वसाहत करायचे मनात असल्याचे वारंवार सांगत असतो. अंतरिक्ष तज्ञतेचा मी बादशहा असेन असेही सांगतो.

त्यांनी त्या संदर्भात काय करावे ही त्यांची खाजगी बाब असेल. पण अमेरिकन जनांनी ट्रम्प यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे की आपली दोस्ती अविलंब थांबवावी. एलन मस्क यांचा राज्यव्यवस्थेत अजिबात हस्तक्षेप नको.

अन्यथा आंदोलन अधिक व्यापक व तीव्र केले जाईल.

० रणजित मेश्राम

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!